ETV Bharat / bharat

Share Market Weekly Prediction : 'या' गोष्टी या आठवडय़ातील शेअर बाजाराची दिशा ठरवतील, वाचा सविस्तर - NSE NIFTY

चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात सातत्याने वाढ होण्याची शक्यता असताना भारतीय बाजारात अस्थिरता कायम राहील. स्टॉक ब्रोकर्स संघटना ANMI ने सरकार, स्टॉक एक्स्चेंज आणि सेबीला होळीची सुट्टी 7 मार्च ऐवजी 8 मार्चला देण्याची विनंती केली आहे.

Share Market Weekly Prediction
शेअर बाजार
author img

By

Published : Mar 5, 2023, 4:18 PM IST

नवी दिल्ली : जागतिक चलन आणि परदेशी निधीचा कल यावरून शेअर बाजारांची दिशा या आठवड्यात ठरणार आहे. होळीच्या सुट्टीमुळे आठवड्यातील कामकाजाचे दिवस कमी झाले आहेत, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने होळीनिमित्त ७ मार्चला (मंगळवार) सुट्टी जाहीर केली आहे. तथापि, स्टॉक ब्रोकर्सची संघटना ANMI (ANMI) ने सरकारसह, स्टॉक एक्सचेंज आणि सेबीला होळीची सुट्टी 7 मार्च ऐवजी 8 मार्चला देण्याची विनंती केली आहे.

10 मार्चला होणार आकडेवारी जाहीर : स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट लि.चे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक प्रवेश गौर म्हणाले, 'महागाई रोखण्यासाठी यूएस मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात सातत्याने वाढ होण्याच्या भीतीने भारतीय बाजारपेठा अस्थिर राहतील, तेव्हा निरीक्षण केले पाहिजे.' गौर यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर अमेरिकेचा मॅक्रो इकॉनॉमिक डेटा 10 मार्च रोजी जारी केला जाणार आहे, बँक ऑफ जपान देखील व्याजदरांबाबत निर्णय घेणार आहे. त्याच वेळी, देशांतर्गत स्तरावर भारताच्या औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी देखील 10 मार्च रोजी जारी केली जाईल.

आठवड्यात व्यापाराचे दिवस कमी झाले : बाजारातील गुंतवणूकदार अमेरिकन डॉलर आणि ब्रेंट क्रूड ऑइलच्या तुलनेत रुपयाच्या हालचालीवरही लक्ष ठेवतील. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष, अजित मिश्रा म्हणाले की, 'होळीच्या सणामुळे या आठवड्यात व्यापाराचे दिवस कमी झाले आहेत. मिश्र सिग्नलमध्ये अस्थिरता जास्त राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सहभागी औद्योगिक उत्पादन डेटाची वाट पाहत आहेत, जे 10 मार्च रोजी प्रसिद्ध होईल.' याशिवाय ते जागतिक निर्देशांकांच्या कामगिरीवर, विशेषतः अमेरिकन बाजारांवर लक्ष ठेवतील.

शुक्रवारी बाजार तेजीसह बंद : गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 345.04 अंकांनी किंवा 0.58 टक्क्यांनी वाढला होता. उच्च अस्थिरता असूनही शुक्रवारी बाजार तेजीसह बंद झाला. 30 शेअर्सचा सेन्सेक्स शुक्रवारी 899.62 अंकांनी किंवा 1.53 टक्क्यांनी वाढून 59,808.97 वर बंद झाला.

हेही वाचा : Share Market Update : आशियाई शेअर बाजारात वाढ, अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया वाढला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.