ETV Bharat / bharat

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सात जणांना अटक, सर्व समाजकंटक रणधीर सेनेशी संबंधित - समाजकंटक रणधीर सेनेशी संबंधित

बंगळुरू शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी (Shivaji statue desecration Case) पोलिसांनी 13 पैकी सात आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. अटक केलेल्यांमध्ये रणधीर सेनेचा अध्यक्ष चेतन गौडा याचा समावेश आहे. बंगळुरूतील सनकी टँक रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.

Shivaji statue desecration
Shivaji statue desecration
author img

By

Published : Dec 19, 2021, 6:59 PM IST

बंगळुरू - बंगळुरू शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची (Shivaji statue desecration Case) घटना शुक्रवारी रात्री घडली होती. या घटनेनंतर कर्नाटक-महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली होती. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून या संशयित आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

बंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिसांनी याप्रकरणी सात संशियतांना अटक केली आहे. सर्व संशयित रनधीर सेनेशी (Karnataka Ranadhira Force) संबंधित आहेत. अटक केलेल्यांमध्ये रणधीर सेनेचा अध्यक्ष चेतन गौडा याचा समावेश आहे. बंगळुरूतील सनकी टँक रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Shivaji statue desecration Case) करण्यात आली होती.

माहिती देताना पोलिस अधिकारी

अटक केलेल्यांमध्ये चेतन कुमार, माजी आमदार टी. नारायण कुमार यांचा मुलगा व राष्ट्रीय अखिल कर्नाटक कन्नड आंदोलन समितीचा अध्यक्ष गुरुदेव नारायण कुमार यांचा समावेश आहे. त्याचबरोबर वरूण, नवीन गौडा, विनोद, चेतन कुमार व योगेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोल्हापूर येथे कन्नड ध्वज जाळल्याच्या घटनेचा बदला म्हणून संशयितांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळी शाई फेकली होती. या घटनेनंतर बेळगावमध्ये दोन गटात हाणामारी झाली होती.

विटंबनेचा प्लान चार दिवसांपूर्वी ठरला -

बंगळुरू सेंट्रल डीव्हीजनचे डीसीपी अनुचेत यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, संशयितांनी चार दिवसापूर्वी पुतळा विटंबनेचा प्लान बनवला होता. सनकी टँकजवळच्या पुतळ्याची त्यांनी सोमवारी व मंगळवारी रेकी केली होती. ते बुधवारी पुन्हा त्या भागात आले होते मात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी त्यांना हाकलले होते. या ठिकाणी असणारा शिवाजी महाराजांचा पुतळा खूप उंचीवर आहे. त्यामुळे त्यांनी आपल्यासोबत शिडी आणली होती. शुक्रवारी रात्री एक कार, दोन ऑटो व एका मोटारसायकलवरून 13 जण आले प त्यांनी पुतळ्याची विटंबना केली. वरून व विनोद Karnataka Ranadhira Force) यांनी पुतळ्यावर शाई फेकली व नवीन गौडा याने याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे व इतरांचा शोध सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.