ETV Bharat / bharat

बायको पळून गेल्याच्या धक्क्यानंतर बनला सिरियल किलर, १८ महिलांची केली हत्या - हैदराबाद सिरियल किलर

हैदराबादमधील मुलूगू पोलीस स्टेशन आणि घटकेसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या दोन खुनांचा तपास करत असताना पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. राचाकोंडा पोलीस आणि हैदराबाद पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jan 27, 2021, 12:51 PM IST

हैदराबाद - तेलंगाणा राज्यात अंगावर काटा आणणारी एक घटना समोर आली आहे. बायको पळून गेल्यानंतर एका व्यक्तीच्या मनात महिलांबद्दल राग उत्पन्न झाला होता. या रागातून त्याने तब्बल १८ महिलांची हत्या केली. माईना रामूलू असे या सिरियल किलरचे नाव असून त्याच्यावर २१ गुन्हे दाखल आहेत. हैदराबाद पोलिसांनी या मोस्ट वॉन्टेंड किलरच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपीवर २१ गुन्हे दाखल

हैदराबादमधील मुलूगू पोलीस स्टेशन आणि घटकेसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या दोन खुनांचा तपास करत असताना पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. राचाकोंडा पोलीस आणि हैदराबाद पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या आधी आरोपी मुलूगूवर २१ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मालमत्तेसंदर्भातील गुन्हे तसेच पोलीस कोठडीतून पळून गेल्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

पत्नी पळून गेल्यानंतर महिलांबद्दल मनात राग -

हैदराबाद शहराचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली की, १ जानेवारीला कवाला अनाथाईआ या व्यक्तीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार जुबली हिल्स पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या महिलेचा शोध घेत असताना घटकेसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रुळावर या बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला होता.

आरोपी रामूलू संगारे्डडी जिल्ह्यातील अरुताला गावातील रहिवासी आहे. तो २१ वर्षांचा असताना त्याचा विवाह झाला. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पत्नी घर सोडून पळून गेली. त्यानंतर रामूलूला महिलांबद्दल मनात राग निर्माण झाला होता. या रागातून त्याने महिलांची हत्या करण्यास सुरूवात केली होती. २००३ पासून आरोपीने १८ महिलांची हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे, असे कुमार यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.