लखनौ : राजधानी लखनऊमधील चौधरी चरण सिंग विमानतळावर बुधवारी बॅग तपासणीदरम्यान सीआयएसएफच्या जवानांना एका प्रवाशाच्या बॅगमधून सॅटेलाइट ( Satellite phone found from passenger bag ) मिळाला. प्रवाशाकडून बंदी असलेला फोन जप्त झाल्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली ( Satellite phone found at Lucknow airport ) आहे. सध्या सीआयएसएफच्या जवानांनी प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
त्यानंतर पोलिसांनी सॅटेलाइट फोन ताब्यात घेऊन प्रवाशाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या प्रवाशाची पोलीस चौकशी करत आहेत. चौधरी चरणसिंग विमानतळावर तैनात असिस्टंट सिक्युरिटी मॅनेजर विपुल कुमार यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी 6 वाजता लखनौहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट (AI-626) मध्ये प्रवाशांना चढवले जात होते.
यादरम्यान विमानात चढण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची नेहमीप्रमाणे तपासणी करण्यात येत होती. तपासणीदरम्यान सीआयएसएफच्या जवानांना प्रवाशाच्या बॅगेतून एक सॅटेलाइट फोन सापडला.
प्रतिबंधित फोनसह पकडलेला प्रवासी उन्नाव जिल्ह्यातील बारसागवार पोलीस स्टेशन हद्दीतील दौडिया खेडा येथील रहिवासी आहे. कुलदीप वृंदावन असे या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, कुलदीप हा प्रवासी लखनौहून दुबईमार्गे मुंबईला जाण्याचा प्रयत्न करत होता, त्याला मुंबई गाठून दुबईचे विमान पकडायचे होते.
एक दिवसापूर्वी म्हणजेच मंगळवारी राजधानी लखनऊच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून सुमारे २० लाख रुपयांच्या एअरगन आणि उपकरणे जप्त करण्यात आली होती. त्यामुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली असतानाच आज सॅटेलाईट फोन परत मिळाल्याने पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : Nokia New Mobile : नोकियाने अधिक चांगल्या फीचर्ससह 'हा' फोन स्वस्त दरात केला लॉन्च