ETV Bharat / bharat

खळबळजनक! हरिद्वारमध्ये साधूची दगडाने ठेचून हत्या - हरिद्वारमध्ये साधूची हत्या

उत्तराखंडच्या हरिद्वारमधील भूपतवाला भागात गुरुवारी सकाळी एका साधूचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. काही अज्ञात इसमांनी साधूला दगडाने ठेचून मारल्याची माहिती स्थानिकांनी दिली. का मारले गेले याचे कारण कोणालाही माहिती नाही.

हरिद्वार
हरिद्वार
author img

By

Published : Jan 21, 2021, 3:14 PM IST

हरिद्वार - उत्तराखंडच्या हरिद्वारमधील भूपतवाला भागात गुरुवारी सकाळी एका साधूचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. साधूची ओळख पटलेली नाही. परंतु पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. काही अज्ञात इसमांनी साधूला दगडाने ठेचून मारल्याची माहिती स्थानिकांनी दिली. का मारले गेले याचे कारण कोणालाही माहिती नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरु आहे. साधूच्या मृत्यूनंतर परिसरात तणाव वाढला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील पालघरमध्ये सांधूची हत्या झाली होती. त्यावरून मोठे राजकीय वांदग निर्माण झालं.

पालघर साधू हत्याकांड -

16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

हेही वाचा - पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, आमदार अन् खासदारांना टोचणार कोरोना लस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.