एर्नाकुलम (केरळ ) : लक्षद्वीप किनार्यावर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. महसूल, गुप्तचर संचालनालय आणि तटरक्षक दलाने ‘ऑपरेशन खोजबीन’ नावाने केलेल्या संयुक्त कारवाईत तामिळनाडूच्या मासेमारी नौकांमधून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे 1526 कोटी रुपये मूल्याचे 218 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. प्रिन्स आणि लिटल जीसस या बोटीत हे हेरॉईन सापडले.
२१८ पॅकेटमध्ये हेरॉईन : दोन्ही बोटी १८ मे रोजी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. दोन मासेमारी बोटींमध्ये प्रत्येकी एक किलोच्या २१८ पॅकेटमध्ये हेरॉईन ठेवण्यात आले होते. विशेष गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने तपास सुरू केला. कुलाचल येथील मच्छिमार बोटींवर होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, कोची येथे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांपैकी चार मल्याळी असल्याची माहिती मिळाली आहे.
मोठ्या प्रमाणावर ठेवली पाळत : त्यानंतर बोटींना तपशीलवार तपासणीसाठी कोची येथील तटरक्षक दलाच्या मुख्यालयात नेण्यात आले. एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार जप्तीची कारवाई डीआरआयकडून सुरू आहे. DRI आणि ICG द्वारे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पाडले गेले. मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवल्यानंतर हेरॉईनची तस्करी करणाऱ्या मासेमारी बोटी सापडल्या.
हेही वाचा : Kerala's K-FON : केरळ सरकारचा उपक्रम; 20 लाख कुटुंबाना मिळणार इंटरनेट कनेक्शन