ETV Bharat / bharat

Suitcase Murder Case : 'सुटकेस मर्डर'चा झाला खुलासा.. प्रेयसीच्या हत्येसाठी प्रियकराने बनविला होता 'फुलप्रूफ प्लॅन'..

घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यानंतर प्रेयसीने घरच्यांचे म्हणणे ऐकले. त्यामुळे नाराज झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या हत्येसाठी 'फुलप्रूफ प्लॅन' बनविला. प्रेयसीला हॉटेलच्या खोलीत घेऊन जात तिचा 'मर्डर' केला. एव्हढ्यावरच प्रियकर थांबला नाही तर, प्रेयसीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने त्याचा हा बनाव उघडकीस आला. उत्तराखंडमधल्या रुरकी येथील पिरान कालियार येथे ही घटना घडली.

'सुटकेस मर्डर'चा झाला खुलासा.. प्रेयसीच्या हत्येसाठी प्रियकराने बनविला होता 'फुलप्रूफ प्लॅन'..

author img

By

Published : Mar 25, 2022, 7:58 PM IST

रुरकी ( उत्तराखंड ) : पिरान कालियार येथील हॉटेलमध्ये सुटकेसमध्ये भरलेला तरुणीचा मृतदेह गुरुवारी सापडला. तरुणीच्या प्रियकराने सुरुवातीस प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात हा बनाव उघडकीस आला. घटनेचा खुलासा करताना देहातचे पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोवाल म्हणाले की, आरोपी प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रियकर मृतदेहाला सुटकेसमध्ये भरून घेऊन निघाला होता. त्याने हॉटेलमध्ये रूम मिळवण्यासाठी मुलीच्या फेक आयडीचा वापर केला होता. हत्या करण्यात आलेली तरुणी ही मंगळूरची रहिवासी होती आणि आरोपी तरुणाची दूरची नातेवाईकही होती.

'सुटकेस मर्डर'चा झाला खुलासा.. प्रेयसीच्या हत्येसाठी प्रियकराने बनविला होता 'फुलप्रूफ प्लॅन'..

हॉटेल कर्मचाऱ्यांना आला संशय : गुरुवारी रात्री उशिरा घोसियन ज्वालापूर (हरिद्वार) येथील रहिवासी गुलजेबचा मुलगा सनवर याने रुरकी येथील पिरान कालियार येथे असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये खोली घेतली. गेस्ट हाऊसमध्ये तो त्याची गर्लफ्रेंड रामशा हिच्यासोबत थांबला होता. काही तासांनंतर गुलजेब जड सुटकेस घेऊन हॉटेलबाहेर आला. त्यावेळी हॉटेल कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. त्याला पकडल्यानंतर सुटकेस उघडली असता त्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. यावेळी उपस्थितांनी घटनेची माहिती पोलिसांना देत आरोपी तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

लग्नाला होता विरोध : पोलीस अधीक्षक डोवाल यांनी या घटनेचा खुलासा करताना सांगितले की, आरोपी तरुणाने मुलीची हत्या केली आहे. आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले की, मुलीचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते आणि ही तरुणीही कुटुंबाच्या निर्णयासोबत होती. याचा राग आल्याने प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेह सुटकेसमध्ये टाकला होता.

आत्महत्येची कहाणी निघाली खोटी : गुरुवारी सायंकाळी उशिरा लोकांनी आरोपी तरुणाला पकडले असता, त्याने खोटी कहाणी सांगितली. सुरुवातीला त्याने दोघेही आत्महत्या करण्यासाठी आल्याचे सांगितले होते. मात्र मुलीने विष प्राशन केले आणि तिचा मृतदेह गंगानगरमध्ये टाकून तो स्वतः गंगानगरमध्ये आत्महत्या करणार असल्याचे त्याने सांगितले होते.

आरोपी खोटे बोलत राहिला : तरुणाने संपूर्ण नियोजन करून ही घटना घडवून आणली होती. सुटकेस आधीच आणून ठेवली. काजल नावाच्या तरुणीचा बनावट आयडी त्याने हॉटेलमध्ये जमा केला होता. रमशा असे मृत तरुणीचे नाव असून ती मंगळुरू येथील रहिवासी होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.