कोलकत्ता - आज म्हणजेच 10 जून रोजी या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण सूर्यास्ताच्या काही काळापूर्वी फक्त अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या काही भागात दिसेल. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल आणि जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ही खगोलीय घटना घडते. एमपी बिर्ला प्लॅनेटेरियमचे संचालक देबिप्रसाद दुरई म्हणाले की, सूर्यग्रहण केवळ अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील काही भागांतूनच दिसेल.
युरोप आणि आशियामध्येही सूर्यग्रहण दिसेल-
हे सूर्यग्रहण अरुणाचल प्रदेशातील दिबंग वन्यजीव अभयारण्याजवळून सायंकाळी 5:52 वाजता पाहिली जाऊ शकते. त्याच वेळी, लडाखच्या उत्तरेकडील भागात, जेथे सूर्यास्त संध्याकाळी 6.15 वाजता होईल तिथे सायंकाळी 6 वाजता सूर्यग्रहण दिसेल. दुरई म्हणाले की, सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाच्या मोठ्या भागात दिसून येईल.
रिंग ऑफ फायर
भारतीय वेळेनुसार सकाळी ११:४२ मिनीटांनी आंशिक सूर्यग्रहण होईल आणि दुपारी साडेतीन वाजतापासून ते कंकणाकृती आकार घेण्यास सुरुवात करेल. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनीटांपर्यंत सूर्याच्या भोवती रिंग ऑफ फायरप्रमाणे दिसेल. दुरई म्हणाले, की सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.४१ मिनिटांनी संपेल. दरम्यान, जगातील अनेक संस्था सूर्यग्रहण झाल्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करत आहेत.
सूर्यग्रहण कोठे दिसेल?
ज्योतिष गणितानुसार सूर्यग्रहण कॅनडा, ग्रीनलँड, रशिया, उत्तर अमेरिका आणि आशियाच्या काही देशांमध्येही दिसून येईल.
हिंदु धर्मात सूर्यग्रहणाला महत्त्व -
हिंदु धर्मात सूर्यग्रहणाला फार महत्त्व आहे. यानिमित्ताने ईटीव्ही इंडियाच्या टीमने ज्योतिषी व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पंडित प्रेम शर्मा यांच्याकडून या दुर्मिळ सूर्यग्रहणाबद्दल माहिती जाणून घेतली. पंडित प्रेम शर्मा यांनी सांगितले की हे सूर्य ग्रहण ज्येष्ठ कृष्ण पक्ष अमावस्येला मृग नक्षत्र आणि वृष राशीत दिसेल. मात्र, त्याचा परिणाम भारतात कमी ठिकाणी दिसून येईल. सूर्यग्रहण दुपारी 1:42 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:41 वाजता संपेल. पंडित प्रेम शर्मा सांगतात, की आपल्या धार्मिक-परंपरानुसार आपल्या देवी-देवतांचे पूजन करा. यथावधी दान करा. तसेच, या काळात सूर्य बीज आणि इतर पूजा करणं चांगलं मानलं गेलं आहे आणि या ग्रहणात अन्नदान सर्वात मोठी देणगी आहे.