ETV Bharat / bharat

75 Years of Independence : भारत मातेचे वीर सुपूत्र बटुकेश्वर दत्त यांची कहाणी

15 ऑगस्ट 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याची ही पहाट पाहण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या वीरांमधीलच एक नाव म्हणजे बटुकेश्वर दत्त. भारत मातेच्या या वीर सुपूत्राचे चाहते स्वत: भगतसिंग ( Bhagat Singh ) हे सुद्धा होते. यामुळे त्यांनी लाहोर येथील सेंट्रल जेलमध्ये बटुकेश्वर दत्त यांचा ऑटोग्राफसुद्धा घेतला होता. ( Revolutionary Batukeshwr Dutt )

revilutionary batukeshwar dutt etv bharat special story over 75 Years of Independence
भारत मातेचे वीर सुपूत्र बटुकेश्वर दत्त यांची कहाणी
author img

By

Published : Feb 13, 2022, 6:03 AM IST

पटना (बिहार) - 15 ऑगस्ट 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याची ही पहाट पाहण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या वीरांमधीलच एक नाव म्हणजे बटुकेश्वर दत्त. भारत मातेच्या या वीर सुपूत्राचे चाहते स्वत: भगतसिंग ( Bhagat Singh ) हे सुद्धा होते. यामुळे त्यांनी लाहोर येथील सेंट्रल जेलमध्ये बटुकेश्वर दत्त यांचा ऑटोग्राफसुद्धा घेतला होता. ( Revolutionary Batukeshwr Dutt )

भारत मातेचे वीर सुपूत्र बटुकेश्वर दत्त यांची कहाणी

भारताच्या इतिहासात वीरतेचा नवीन अध्याय -

पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात 18 नोव्हेंबर 1910मध्ये बटुकेश्वर दत्त यांचा जन्म झाला होता. त्यांना पटना आपली कर्मभूमी बनविली. माध्यमिक शिक्षणासाठी ते कानपुरला आले होते. तिथे त्यांची भेट चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत झाली. 1928मध्ये स्थापन झालेल्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे ते सदस्य झाले. इथेच त्यांची भेट भगत सिंग यांच्यासोबत झाली अन् भारताच्या इतिहासात वीरतेचा नवीन अध्याय इथेच सुरू झाला. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी'पब्लिक सेफ्टी बिल' आणि 'ट्रेड डिस्प्यूट बिल' याला विरोध केला होता. दोघांनी 8 एप्रिल 1929मध्ये सेंट्रल असेंबली मध्ये बॉम्बस्फोट घडवला. यानंतर ब्रिटिश सरकारने भगतसिंग यांना सांडर्सच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. तर बटुकेश्वर यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान द्यायला तयार असलेल्या बटुकेश्वर दत्त यांना फाशीची शिक्षा मिळाली नाही. म्हणून त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. इंग्रजांनी त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवले. बटुकेश्वर दत्त यांना दिलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेदरम्यान त्यांना इग्रंजांनी कठोर यातना दिल्या. जेलमध्ये असताना त्यांनी उपोषण देखील केले होते. 1937मध्ये त्यांना बाकीपुर सेंट्रल जेल पटना येथे आणले गेले. 1938मध्ये त्यांना इग्रजांनी सोडून दिले. यानंतर स्वातंत्राचा ध्यास घेतलेले बटुकेश्वर दत्त यांनी पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीत भाग घेतला. यामुळे इंग्रजांनी त्यांना पुन्हा एकदा अटक केली. 1945मध्ये त्यांना सोडून देण्यात आले. 15 अगस्त 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बटुकेश्वर पटना येथेच राहत होते.

हेही वाचा - 75 Years of Independence : स्वातंत्र्य चळवळीचा ऐतिहासिक वारसा असलेला 'मणि भवन'; वाचा, सविस्तर...

दीर्घ आजारानंतर 20 जुलै 1965मध्ये बटुकेश्वर दत्त यांनी शेवटचा श्वास घेत या जगातून निरोप घेतला. भारत मातेच्या या वीर सुपुत्राने आपल्या शेवटच्या इच्छेत म्हटले होते, त्यांना देखील भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यासोबत दफन करण्यात यावे. त्यांच्या शेवटच्या इच्छेचा सम्मान करत भारत-पाकिस्तान सीमेजवळ हुसैनीवाला येथे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या समाधीजवळ त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.