ETV Bharat / bharat

Pakistani Bully Dog Attacked : पाकिस्तानी शिकारी कुत्र्याचा भारताच्या निवृत्त कर्नलवर हल्ला.. जोराने घेतला चावा

author img

By

Published : Apr 28, 2022, 4:01 PM IST

पाकिस्तानी बुली डॉग कुत्र्याने भारतीय सेवानिवृत्त कर्नलवर अचानक हल्ला ( Retired Colonel attacked by Pakistani Bully Dog ) केला. कुत्रा कर्नलला इतका चावला की, कर्नलला ऑपरेशन करावे लागले. प्लास्टिक सर्जरी आणि स्किन ग्राफ्टिंगचा उपचार कर्नलला करावे लागले. पोलिसांनी पाकिस्तानी बुली डॉगच्या मालकावर गुन्हा दाखल केला ( Case of negligence against Dog Owner ) आहे.

Pakistani Bully Dog
पाकिस्तानी बुली डॉग

जयपूर ( राजस्थान ) : जयपूरच्या वैशाली नगर पोलीस स्टेशन परिसरात लष्कराच्या एका निवृत्त कर्नलला कॉलनीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पाळीव पाकिस्तानी बुली डॉग या शिकारी कुत्र्याने इतक्या क्रूरपणे चावा ( Retired Colonel attacked by Pakistani Bully Dog ) घेतला की, कर्नलवर ऑपरेशन करावे लागले. पाकिस्तानी कुत्र्याच्या मालकाने कर्नलला 1 महिन्याच्या आत कुत्र्याला फार्म हाऊसवर पाठवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासन न पाळल्याने कर्नलने आता वैशाली नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली ( Case of negligence against Dog Owner ) आहे.

तपासी अधिकारी राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, पश्चिम विहारचे रहिवासी 57 वर्षीय सेवानिवृत्त कर्नल हरीश खंगारोट यांनी कॉलनीतील रहिवासी राजेंद्र सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 3 मार्च रोजी हरीश खंगारोट आपल्या घराबाहेर चालत असताना राजेंद्र सिंह यांचा नोकर त्यांच्या पाळीव पाकिस्तानी कुत्र्याला चालवण्यासाठी घराबाहेर आला. त्याचवेळी हरीश खंगारोट यांच्यावर अचानक हल्ला करून कुत्र्याने त्यांच्या पोटावर चावा घेतला.

कर्नलवर करावी लागली सर्जरी : पाकिस्तानी कुत्र्याने कर्नलला जोराने चावले. प्रथम कर्नलवर काही दिवस लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि नंतर एसएमएस रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी करावी लागली. उपचारामुळे कर्नलला त्यावेळी पोलिसात तक्रार करता आली नाही. तर पाकिस्तानी कुत्र्याचा मालक राजेंद्र याने कुत्र्याला 1 महिन्याच्या आत फार्म हाऊसवर पाठवण्याचे आश्वासन दिले.

यासोबतच पश्चिम विहार कॉलनीतील समिती सदस्यांनीही पाकिस्तानी कुत्र्याला वसाहतीबाहेर पाठवण्यात येईल, असे आश्वासन पीडितेला दिले. मात्र एक महिन्याहून अधिक काळ लोटला तरी, अद्यापही पाकिस्तानी कुत्र्याला वसाहतीबाहेर पाठवण्यात आलेले नाही. राजेंद्र सिंह यांचा नोकर सकाळ- संध्याकाळ कॉलनीत पाकिस्तानी कुत्रा फिरवतो. यापूर्वीही पाकिस्तानी कुत्र्याने अशाच प्रकारे 3 जणांवर हल्ला केला आहे. त्यामुळे वसाहतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पीडितेने वैशाली नगर पोलिस ठाण्यात पाकिस्तानी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध निष्काळजीपणा आणि लोकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पाकिस्तानी शिकारी कुत्रा घरात ठेवणे आहे धोकादायक : 'पाकिस्तानी बुली डॉग' हे शिकारी कुत्रे आहेत. जे जंगलात शिकार करताना वापरले जातात. ही कुत्र्यांची एक अतिशय जात आहे ज्याचा स्वभाव अत्यंत संतप्त आहे. पाकिस्तानी बुली डॉग घरात ठेवणे खूप घातक ठरू शकते. जेव्हा राग येतो तेव्हा हा कुत्रा त्याच्या मालकावर आणि आजूबाजूच्या सर्व प्रकारच्या लोकांवर हल्ला करू शकतो. पाकिस्‍तानी बुल्‍ली डॉग घरी पाळणाऱ्या राजेंद्रने महापालिकेकडे कुत्र्याची नोंदणी करून घेतली होती का, त्‍याच्‍याकडे हा कुत्रा पाळण्‍याचा परवाना होता का, या सर्व बाबींचा तपास पोलिस करत आहेत. राज्यात पाकिस्तानी बुलडॉगच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना असावी.

हेही वाचा : 'टॉमी'ला 'कुत्रा' म्हणणं पडलं महागात; दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी.. व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.