पुरी : पिपली ब्लॉकमधील चंद्रादेयपूर पंचायत अंतर्गत असलेल्या ब्राह्मणशाही येथील ग्रामस्थांवर लाखो विषारी लाल मुंग्यांनी आक्रमण केले. गावकऱ्यांना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले People forced to leave homes in Puri village आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना लाल मुंग्यांच्या हल्ल्याचा सामना Red ants menace करावा लागत आहे.
हजारो मुंग्या जवळच्या कालव्याच्या बंधाऱ्यातून त्यांच्या घरात शिरतात. या मुंग्यांच्या चावण्यामुळे त्वचेवर पुरळ आणि खाज सुटते. मुंग्या घरात येऊ नयेत म्हणून त्यांनी कीटकनाशकाचा वापर केला असला तरी त्याचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. लाल मुंग्यांच्या त्रासामुळे चिंतेत असलेले गावकरी आपले गाव सोडण्याचा विचार करत आहेत. या विषारी लाल मुंग्यांनीच या गावकऱ्यांच्या घरात बस्तान मांडल्यामुळे गावकऱ्यांनाच घर सोडण्याची वेळ आली आहे.