मुंबई : आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. (Read Top News Today )
- पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanaraje Bhosale ) यांनी केली होती. कारवाई न झाल्यास 28 नोव्हेंबरला आपण आपली भूमिका स्पष्ट करु असे उदयनराजेंनी जाहीर केले होते. उदयनराजेंना अपेक्षित असलेली कारवाई राज्यपाल आणि त्रिपाठी दोघांवरही न झाल्याने सोमवारी 12 वाजता पुण्यातील रेसिडेन्सी क्लबला पुढील दिशा ठरविण्यासाठी उदयनराजेंच्या उपस्थितीत शिवप्रेमी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले राज्यपाल आणि त्रिपाठी यांच्याबद्दल भूमिका जाहीर करणार आहेत.
- स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील सुप्रीम कोर्टात सुनावणी : 92 नगर परिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, ( OBC Reservation ) थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे.
- महात्मा फुलेंच्या पुणयतिथीनिमित्त कार्यक्रम : आज महात्मा फुलेंची132 वी पुण्यतिथी आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची ( Mahatma Phule and Savitribai Phule )तैलचित्र लावण्यात येणार आहेत. तैलचित्रांच्या अनावरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) आणि छगन भुजबळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. तैलचित्र लावण्याची मागणी छगन भुजबळ यांनी अनेक वर्ष लावून धरली होती.
- नाशिकमध्ये लव्ह जिहाद विरोधात मोर्चा : धर्मातर बंदी कायदा राज्यसह देशभरात लागू करावा, श्रद्धा वालकरच्या मारेकरी आफताबला फासवावर लटकवावे, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या व्यक्ती संघटना, पक्षावर कारवाई करावाई या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिकच्या बी डी भालेकर मैदानापासून मोर्चा सुरुवात होणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात समोर शेवट होणार आहे.
- समता परिषदेच्या पुरस्काराचे वितरण : डून देण्यात येणारा यावर्षीचा महात्मा फुले समता जेष्ठ कवी यशवंत मनोहर यांना परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते फुले वाड्यात प्रदान करण्यात येणार. आज महात्मा फुलेंची 132 वी पुण्यतिथी आहे.
- मुंबईत मेधा पाटकर आणि सुनिती सु.र.यांची पत्रकार परिषद : सरदार सरोवर प्रकल्पाची सत्यता काय यावर मेधा पाटकर आणि सुनिती सु.र. यांची पत्रकार परिषद होणार आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात नर्मदा प्रकल्पाबाबत भाजपकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत ही पत्रकार परिषद होणार आहे.
- मुंबईत राज्यपालांविरोधात छात्रभारतीकडून आंदोलन : राज्यपालांविरोधात छात्रभारतीकडून आंदोलन करण्यात येणार आहे, मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसमध्ये दुपारी 4 वाजता हे आंदोलन होईल.