ETV Bharat / bharat

Gurmeet Ram Rahim Got Parole : बलात्कारी गुरमीत राम रहिमला 30 दिवसांचा पॅरोल, आज संध्याकाळी येणार बाहेर

author img

By

Published : Jul 21, 2023, 2:51 PM IST

डेरा सच्चा सौदा सिरसा प्रमुख बलात्काराचा गुन्हेगार गुरमीत राम रहीमला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. पॅरोलच्या कालावधीत राम रहीम उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमात राहणार आहे. गुरमीत राम रहीमचा 15 ऑगस्टपासून अवतार महिना साजरा केला जातो.

Gurmeet Ram Rahim Got Parole
गुरमीत राम रहिमचे संग्रहित छायाचित्र

रोहतक : डेरा सच्चा सौदा सिरसा प्रमुख गुरमीत राम रहीमला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. आज संध्याकाळी गुरमीत राम रहीम रोहतकच्या सुनारिया कारागृहातून बाहेर येणार आहे. पॅरोलच्या कालावधीत राम रहीम उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमात राहणार आहे. ऑगस्ट महिन्यात डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमचा अवतार महिना साजरा केला जातो. त्यामुळे 15 ऑगस्टला बर्णवा आश्रमात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून गुरमीत राम रहीम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

जानेवारीत मिळाला 40 दिवसांचा पॅरोल : गुरमीत राम महीमला याआधी या वर्षी 21 जानेवारीला 40 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. आता गुरमीत राम रहीमने रोहतक प्रशासनाकडे पॅरोलसाठी अर्ज केला होता. उल्लेखनिय बाब म्हणजे गुरमीत राम रहीमला 2 साध्वींच्या लैंगिक शोषणप्रकरणी 10-10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि माजी व्यवस्थापक रणजित सिंह यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांची नाराजी : गुरमीत राम रहीमला पॅरोल मिळाल्यावर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली. सरकार राम रहीमसारख्या बलात्कारी नराधमांना 2.5 वर्षांत 7 वेळा पॅरोल देईल, असे उपरोधिकपणे त्या म्हणाल्या आहेत. पोलीस बृजभूषण यांच्या जामिनाला न्यायालयात विरोध करणार नाहीत. मणिपूरमधील महिलांच्या शोषणावर मौन बाळगले जाईल, असेही स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

  • राम रहीम जैसे बलात्कारी हत्यारों को 2.5 साल में 7 बार सरकार पैरोल देगी…. #BrijBhushan की बेल का पुलिस कोर्ट में विरोध नहीं करेगी…. मणिपुर में
    महिलाओं के शोषण पर चुप्पी होगी…. बेटी ऐसे बचेगी !

    — Swati Maliwal (@SwatiJaiHind) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दोन साध्वींच्या लैंगिक शोषण प्रकरणात शिक्षा : गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट 2017 रोजी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आणण्यात आले होते. मात्र गुरमीत राम रहीमला अटक करुन कारागृहात आणल्यानंतर पंचकुलामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. 28 ऑगस्टला कारागृहाच्या आवारातच विशेष सीबीआय न्यायालय स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर सीबीआय न्यायाधीश जगदीप सिंह यांनी राम रहीमला दोन साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

पत्रकाराच्या हत्येत शिक्षा : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात राम रहीमला जानेवारी 2019 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये राम रहीमला माजी डेरा व्यवस्थापक रणजित सिंह हत्या प्रकरणातही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राम रहीमला रोहतकच्या सुनारिया कारागृह कॉम्प्लेक्समध्ये एका वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. तुरुंगाच्या आवारात कुटुंबीय आणि वकील वेळोवेळी राम रहीमला भेटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Ram Rahim Parole : राम रहीमला पुन्हा पॅरोल मंजूर, आज तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता
  2. कुणालाच खबर नाही... 'या' दिवशी राम रहीमला मिळाली होती एका दिवसाची पॅरोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.