लखनौ : आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोन मुलींना आधार दिलेल्या नराधमानेच त्यांच्यावर अत्याचार केल्याची किळसवाणी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना लखनौतील बीकेटी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. या दोन बालिकेवर दत्तक घेतलेल्या नराधमाकडून अत्याचार होत असल्याची तक्रार चाईल्डलाईनला फोन करुन देण्यात आली होती. याप्रकरणी बीकेटी पोलीस ठाण्यात त्या नराधमावर गुन्हा दाखल करुन बालिकांची सुटका करण्यात आली आहे.
पीडितने धाय मोकलून आम्हाला मिठी मारली. मला तिथे राहायचे नाही, असे हात जोडून विनवणी केली. मी मरेन पण मला तिकडे पाठवू नका, असेही या पीडितेने यावेळी सांगितले - अर्चना सिंह, व्यवस्थापक 181 वन कर्मचारी केंद्र
पालकांच्या मृत्यूनंतर मुलींना घेतले दत्तक : काही वर्षांपूर्वी या पीडित दोन अल्पवयीन मुलींच्या पालकांचा मृत्यू झाला होता. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही मुली अनाथ झाल्या होत्या. त्यानंतर एका कुटुंबाने दोन्ही मुलींनासोबत नेत दत्तक घेतले होते. त्यानंतर यातील 12 वर्षीय मुलीला ओलीस ठेवून नराधमाने किळसवाणा प्रकार केला. ज्या व्यक्तीला वडिलांचा दर्जा देण्यात आला होता, त्यानेच या बालिकांचे शारीरिक शोषण केल्याने खळबळ उडाली आहे. एका अनोळखी व्यक्तीने फोनवरून चाइल्डलाइनकडे या घृणास्पद कृत्याची तक्रार केली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेश राज्य बाल संरक्षण आयोगाच्या निदर्शनास आले. आयोगाने तात्काळ 181 वन कर्मचारी केंद्राला पत्र लिहून दोन दिवसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलीची सुटका करण्याचे आदेश दिले.
पीडित बालिकांनी रडत कथन केला प्रकार : उत्तर प्रदेश राज्य बाल संरक्षण आयोगाचे पत्र 17 मे रोजी मिळाले होते. त्यानंतर बचाव मोहीम हाती घेण्यात आली. पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास केला असता, भान हरवलेल्या मुली आढळून आल्या. समुपदेशनादरम्यान या निरागस बालिकांनी रडत-रडत आपली आपबिती पथकाला कथन केल्याची माहिती 181 वन कर्मचारी केंद्राच्या व्यवस्थापक अर्चना सिंह यांनी दिली. विशेष म्हणजे या घटनेतील नराधमाला तीन मुले आहेत. विशेष म्हणजे या नराधमाच्या पत्नीला या अत्याचाराची पूर्ण माहिती होती. आम्ही मुलीशी बोललो तेव्हा मुलीने सांगितले की, हे लोक तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आम्हाला घेऊन आले. ज्यांना आपण बाप म्हणायचो, ते दारू पिऊन मोठ्या बहिणीसोबत काय करायचे ते माहीत नाही. एके दिवशी तो तिला जंगलात घेऊन गेला आणि तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केले. मग ती कुठे गायब झाली ते मला कळले नाही, मग ते माझ्याबरोबर असेच करू लागल्याची माहिती पीडितेने दिली. यावेळी त्या पीडितने धाय मोकलून आम्हाला मिठी मारली. मला तिथे राहायचे नाही, असे हात जोडून विनवणी केली. मी मरेन पण मला तिकडे पाठवू नका, असेही या पीडितेने यावेळी स्पष्ट केल्याची माहिती अर्चना सिंह यांनी दिली.
नराधमाच्या आवळल्या मुसक्या : पालकाच्या मृत्यूनंतर बालिकांवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाने देशभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. 181 वन स्टॉप सेंटरने मुलींवर झालेल्या गुन्ह्याची माहिती दिली होती. त्यानंतर आरोपींविरुद्ध पोक्सो आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. त्याची चौकशी करून त्याला कारागृहात पाठवले जाणार असल्याची माहिती बीकेटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रिजेश चंद तिवारी यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- Kota Online Fraud Case : मुंबईत बनावट फर्म करून शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक; पोलिसांनी पाच आरोपीच्या आवळल्या मुसक्या
- CBI : गुप्त माहिती विदेशी एजन्सीला पुरवल्याबद्दल पत्रकारासह माजी नौसेना कमांडरला अटक
- Mobile Phone Exploded In Pocket : खिशात मोबाईलचा स्फोट होऊन लागली आग; वेळीच आग विझविल्याने वाचले प्राण