गुमला - बलात्काराचे आरोपी ( Rape accused ) असलेल्या दोघांना त्यांच्या दुचाकीसह जिवंत जाळण्यात ( Burnt Alive ) आले. सुनील उरांव आणि आशिष उरांव अशी या दोघांची नावे आहेत. पेटवून दिल्यानंतर दोघे जिवाच्या आकांताने पळाले आणि आपल्या गावात पोहोचले. त्यांच्या गावातील नागरिकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचारानंतर रिम्स येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यास सांगितले. रिम्समध्ये उपचारा दरम्यान सुनील उरांव याचा मृत्यू झाला.
आपल्या गावातील दोघांना जिवंत जाळल्याचे कळाल्याने गावकरी संतप्त झाले. संतापाच्या भरात त्यांनी खून का बदला खून अशी मागणी केली. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच तेथील पोलिस स्टेशनचे प्रभारी मनीष चांद यांच्यासहित अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांनी लोकांना समजावून शांत केले.
मृत सुनील याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, किशुन उरांव हा बुधवारी रात्री काही लोकांसोबत त्यांच्या गावात आला. त्याने सुनील आणि आशिष यांच्या चर्चा करायची आहे, असे सांगून त्यांना आपल्या गावी घेऊन गेला. तिथे त्या दोघांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून टाकण्यात आले. पेटलेल्या अवस्थेत ते दोघे जिवाच्या आकांताने धावले. कसेतरी करून आग विझवून ते आपल्या गावात पोहोचले. स्थानिकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जिथे उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाला तर आशिषची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेची माहिती देताना पोलिस अधिकारी मनीष चंद्र लाल म्हणाले की, या दोघांवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. लोकांनी बदला घेण्याच्या भावनेतून त्या दोघांना जिवंत जाळले. पीडितेच्या नातेवाईकांनी या दोघांना आपल्या गावात बोलाविले आणि तिथे संतप्त नागरिकांनी जिवंत पेटवून दिले.
हेही वाचा - Sangli Crime News : नकली नोटा खपवणारी टोळी गजाआड; तिघांना अटक, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त