ETV Bharat / bharat

राजस्थानमधील शिवसेनेच्या एकमेव उमेदवाराचा निकाल काय लागला? मुख्यमंत्री गेले होते प्रचाराला - राजेंद्र सिंह गुढा निकाल

Rajasthan Election Result २०२३ : राजस्थानमध्ये काँग्रेसला जोर का झटका देत भाजपा सत्तेत आलं आहे. काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारला पराभवाचा सामना करायला लागला. राजस्थानच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उमेदवार उभा केला होता.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 10:14 PM IST

जयपूर Rajasthan Election Result २०२३ : भाजपानं गेहलोत सरकारवर 'लाल डायरी' (Rajasthan Lal Diary Case) या मुद्द्यावरून घेरलं होतं. अशोक गेहलोत सरकारवर या मुद्द्यावरुन जोरदार टीका करण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाचे एकमेव उमेदवार असलेले राजेंद्र सिंह गुढा (Rajendra Singh Gudha) यांनी लाल डायरीचा मुद्दा उचलून धरला होता. आता याच गुढा यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. उदयपूरवाटी मतदारसंघातून (Udaipurwati Result) भाजपाच्या शुभकरण चौधरी यांनी राजेंद्र गुढा यांचा पराभव केलाय.

कोण आहेत राजेंद्र सिंह गुढा? : राजेंद्र हे राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवाटी मतदारसंघातील गुढा या गावचे रहिवासी आहेत. राजेंद्र यांनी नावामागं गुढा या आपल्या गावाचं नाव देखील जोडलं होतं. त्यानंतर ते राजेंद्र गुढा या नावानं त्या परिसरात प्रचलित झाले. राजेंद्र गुढा यांनी 2018 मध्ये बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजेंद्र गुढा गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ते बसपामधून निवडून आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते मंत्री बनले. परंतु निवडणुकीच्या आधी लाल डायरी आणि महिला संरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री प्रचारासाठी गेले होते राजस्थानला : एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच राजस्थानच्या उदयपूरवाटी मतदारसंघातून माजी मंत्री राजेंद्र गुढा यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या चिन्हावर निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. राजेंद्र गुढा यांच्या समर्थनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठी प्रचारसभासुद्धा घेतली होती.

हेही वाचा -

  1. भाजपाच्या विजयाचं श्रेय महिलाशक्तीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्टोक्ती, युवक शेतकऱ्यांसह गरिबांचेही मानले आभार
  2. तेलंगाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; 'बीआरएस'च्या कारला लागला ब्रेक, भाजपाचाही वाढला आकडा
  3. तेलंगणात झळकले महाराष्ट्राचे माणिक'राव'; काँग्रेस विजयात 'ठाकरें'चं योगदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.