ETV Bharat / bharat

Ashok Gehlot Budget : अन् राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वाचला जुनाच अर्थसंकल्प! गदारोळानंतर कामकाज तहकूब - विधानसभेत वाचला जुना अर्थसंकल्प

राजस्थानच्या विधानसभेत आज एक अजब घटना घडली. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सभागृहात जुनाच अर्थसंकल्प वाचल्याचे उघडकीस आले.

Ashok Gehlot
अशोक गेहलोत
author img

By

Published : Feb 10, 2023, 1:38 PM IST

मुख्यमंत्री अशोक गेहलोत

जयपूर (राजस्थान) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज आपल्या या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी त्यांच्याकडून जुन्याच अर्थसंकल्पाची प्रत वाचण्यात आल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळात सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.

कवितेने अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात : 11:00 वाजता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कवितेने अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. गेहलोत म्हणाले, जर आपले कर्म सत्य असेल तर आपल्याला त्या कर्माचे फळ निश्चितच मिळेल. प्रत्येक संकटावर उपाय आहे. तो आज नाही तर उद्या मिळेलच'. गेहलोत यांनी नरेगा, शालेय शिक्षण, शहरी हमी योजना, गरीब कुटुंबांना रेशनसह अनेक घोषणा केल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केल्यानंतर मुख्य सचिव महेश जोशी यांनी त्यांना रोखले आणि ते वाचत असलेला हा अर्थसंकल्प जुना असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. सभागृहात जुन्या अर्थसंकल्पाचे वाचन सुरू असल्याची माहिती मिळताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. सुमारे ५ मिनिटे विरोधकांनी गदारोळ केला.

कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब : त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांना सभागृह चालू द्या, सभागृहाचे कामकाज उशिराने सुरू आहे, अशी विनंती केली. सभापतींच्या सततच्या सूचनांनंतरही विरोधकांनी आपला गदारोळ कमी केला नाही. वाढत्या गदारोळातच विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांच्या वागण्याने दुखावल्यामुळे त्यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले आहे.

वित्त अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता : राजस्थानच्या इतिहासातील हे कदाचित पहिलेच प्रकरण असेल जेव्हा एखादा मुख्यमंत्री आपला अर्थसंकल्प सादर करत असेल आणि तो अर्थसंकल्प जुना असेल. राजस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण तीस मिनिटे थांबवण्यात आले. मुख्यमंत्री गेहलोत यांनी जुना अर्थसंकल्प वाचल्याचा आरोप विरोधकांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या ब्रीफकेसमध्ये जुने बजेट आलेच कसे, हा मोठा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. आता या गंभीर त्रुटींबद्दल वित्त विभागातील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

संसदेत आरोग्याच्या मुद्यावरून वाद : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मांडविया आणि द्रमुकच्या खासदारांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्यावरून वाद झाला. 'मी अशी वैद्यकीय महाविद्यालये चालवणार नाही जिथे पुरेसे प्राध्यापक आणि पायाभूत सुविधा नाहीत. एम्स मदुराईच्या स्थापनेवर काम सुरू आहे. आरोग्याला राजकारणाचा मुद्दा बनवू नका,' असे आरोग्य मंत्री यावेळी म्हणाले.

हेही वाचा : LIC Adani Meet : एलआयसीच्या अधिकाऱ्यांची अदानी समूहासोबत बैठक, एलआयसीला तिसऱ्या तिमाहीत झाला इतका नफा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.