ETV Bharat / bharat

Raj Babbar Case : शिक्षेविरोधात राज बब्बर यांची सत्र न्यायालयात याचिका

काँग्रेस नेते ( Congress leader ) आणि तत्कालीन समाजवादी पक्षाचे उमेदवार राज बब्बर यांना ( Raj Babbar ) 28 वर्षांपूर्वी मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यांना 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि 6 हजार 500 रुपयांच्या दंडाच्या शिक्षेचे आदेश दिले होते. आता राज बब्बर यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल ( Raj Babbar filed a petition ) केले आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या शिक्षेच्या निर्णयाला आव्हान देणारे त्यांचे अपील प्रभारी सत्र न्यायाधीश मीना श्रीवास्तव यांनी सुनावणीसाठी स्वीकारले आहे.

Raj Babbar Case
राज बब्बर
author img

By

Published : Jul 16, 2022, 12:56 PM IST

लखनऊ - काँग्रेस नेते ( Congress leader ) आणि तत्कालीन समाजवादी पक्षाचे उमेदवार ( Raj Babbar ) यांची नियमित न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. या प्रकरणी 6,500 रुपयांच्या दंडाचीही शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे. 28 वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत मतदान अधिकारी आणि इतर लोकांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवले ( Court sentenced Raj Babbar ) होते. आता राज बब्बर यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल ( Raj Babbar filed a petition ) केले आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या शिक्षेच्या निर्णयाला आव्हान देणारे त्यांचे अपील प्रभारी सत्र न्यायाधीश मीना श्रीवास्तव यांनी सुनावणीसाठी स्वीकारले आहे.

6 हजार 500 रुपयांचा दंड - येथील खासदार आमदारांच्या प्रकरणांसाठीच्या विशेष न्यायालयाचे विशेष अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरिश कुमार श्रीवास्तव यांनी हा निर्णय दिला होता. आता राज बब्बर यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल ( Raj Babbar filed a petition ) केले आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या शिक्षेच्या निर्णयाला आव्हान देणारे त्यांचे अपील प्रभारी सत्र न्यायाधीश मीना श्रीवास्तव यांनी सुनावणीसाठी स्वीकारले आहे. राज बब्बर यांना सुनावण्यात आलेल्या 6 हजार 500 रुपयांच्या दंडाच्या शिक्षेत न्यायालयाने हस्तक्षेप केला नसला तरी तो 15 दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांची नियमित जामिनावर सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

सर्व शिक्षा एकत्र - खासदार-आमदार न्यायालयाचे विशेष अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरिश कुमार श्रीवास्तव यांनी राज बब्बर यांना 7 जुलै रोजी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 6,500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या खटल्यात राज बब्बरसोबत आरोपी असलेले अरविंद सिंह यादव यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 143 अंतर्गत 6 महिने कारावास आणि 1 हजार रुपये दंड, कलम 332 अन्वये 2 वर्षे कारावास आणि 4 हजार रुपये दंड, कलम 353 नुसार 1 वर्षाची शिक्षा आणि 1 हजार रुपये दंड ठोठावला होता. याशिवाय न्यायालयाने कलम 323 मध्ये 6 महिने तुरुंगवास आणि 500 ​​रुपये दंड ठोठावला आणि सर्व शिक्षा एकत्र चालतील असे सांगितले. दंड न भरल्यास राज बब्बरला आणखी १५ दिवसांचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. या प्रकरणाचा अहवाल मतदान अधिकारी श्री कृष्ण सिंह राणा यांनी 2 मे 1996 रोजी राज बब्बर आणि अरविंद सिंह यादव यांच्या व्यतिरिक्त अज्ञात लोकांविरुद्ध वजीरगंज पोलीस ठाण्यात दाखल केला होता.

सहकाऱ्यांसह मारहाण केल्याचा आरोप - या अहवालात म्हटले आहे की, मतदारांनी मतदान केंद्र क्रमांक 192/103 येथे बूथ क्रमांक 192 वर येणे बंद केले. तेव्हा अधिकारी जेवण करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर जात होते. दरम्यान, सपाचे उमेदवार राज बब्बर हे आपल्या सहकाऱ्यांसह मतदान केंद्रावर आले आणि त्यांनी बनावट मतदानाचे खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. राज बब्बर आणि त्यांच्या साथीदारांनी मतदान अधिकारी आणि शिवकुमार सिंग यांना मारहाण केल्याचा ( Polling officer assault case ) आरोप आहे.

आरोपींविरोधात पुरावे हस्तगत - दरम्यान, मनोजकुमार श्रीवास्तव यांच्या व्यतिरिक्त मतदान केंद्राच्या बूथ क्रमांक 191 मध्ये नियुक्त मतदान अधिकारी व्ही. के. शुक्ला आणि पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि राज बब्बर आणि अरविंद यादव यांच्या विरोधात पुरावे सापडले आणि 23 सप्टेंबर 1996 रोजी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने आरोपींना समन्स बजावले. यानंतर 7 मार्च 2020 रोजी राज बब्बरवर आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी पक्षाने श्री कृष्णसिंह राणा, शिवकुमार सिंग, मनोज श्रीवास्तव, चंद्रदास साहू याशिवाय डॉ. एम.एस. कालरा यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर केले होते.

हेही वाचा - Aarey Car Shed No further Tree Cutting Required:'आरे कारशेड'साठी आणखी झाडे तोडण्याची गरज नाही - किरीट समैया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.