नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी कोविड-19 नियंत्रणातील अपयशावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ आपल्या टि्वटर खात्यावरून शेअर केला आहे. मोदी सरकारने योग्य लसीकरण धोरण अवलंबले पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला मोफत लस दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मोफत लसीकरणासाठी #SpeakUpForFreeUniversalVaccination हे अभियान काँग्रेसकडून राबवण्यात येत आहे. #SpeakUpForFreeUniversalVaccination अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन राहुल गांधींनी नागरिकांना केले आहे.
-
कोरोना महामारी के ख़िलाफ़ सबसे मज़बूत सुरक्षा कवच सिर्फ़ वैक्सीन है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
देश के जन-जन तक मुफ़्त टीकाकरण पहुँचाने के लिए आप भी आवाज़ उठाइये- केंद्र सरकार को जगाइये!#SpeakUpForFreeUniversalVaccination pic.twitter.com/SEFhwokfSU
">कोरोना महामारी के ख़िलाफ़ सबसे मज़बूत सुरक्षा कवच सिर्फ़ वैक्सीन है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 2, 2021
देश के जन-जन तक मुफ़्त टीकाकरण पहुँचाने के लिए आप भी आवाज़ उठाइये- केंद्र सरकार को जगाइये!#SpeakUpForFreeUniversalVaccination pic.twitter.com/SEFhwokfSUकोरोना महामारी के ख़िलाफ़ सबसे मज़बूत सुरक्षा कवच सिर्फ़ वैक्सीन है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 2, 2021
देश के जन-जन तक मुफ़्त टीकाकरण पहुँचाने के लिए आप भी आवाज़ उठाइये- केंद्र सरकार को जगाइये!#SpeakUpForFreeUniversalVaccination pic.twitter.com/SEFhwokfSU
लसीकरण गरचेचे असल्याचे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. कोरोना साथीचे निर्मूलन करायचे असेल तर लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. त्यामुळे देशातील लोकांना मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी आवाज उठविला पाहिजे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. केंद्र सरकारला जागे करण्याचे आवाहन त्यांनी देशवासियांना केले.
राज्यांत गंभीर स्थिती...
संपूर्ण भारतामध्ये कोरोना महामारीमुळे अनेक राज्यांत गंभीर स्थिती आहे. मात्र, कोरोनासाठी केंद्र सरकारने कोणतीही ठोस लसीकरण अवलंबले नाही. यासाठी सरकारने लसीकरण रणनिती ठरवावी आणि प्रत्येक नागिरकाला मोफत लस मिळेल, हे सुनिश्चि करावे, असे राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.
मोफत लसीकरण मोहीम राबवणे गरजेचे -
काँग्रेसकडून मोदी सरकारच्या लसी धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोदी सरकारच्या कमकुवत धोरणांमुळे देश अडचणीत सापडला आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे. लसीच्या वेगवेगळ्या किंमतींमुळे राज्य सरकारांवर ओझे वाढले आहे. अशा परिस्थितीत देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्यासाठी लसीकरणाची गती वाढवून मोफत लसीकरण मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे.
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...
सध्या देशात 17 लाख, 93 हजार 645 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 207 कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ३ लाख, 35 हजार 102 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख, 31 हजार 456 लोकांनी कोरोनावर मात केल्याचेही मंत्रालयाने सांगितले. आतापर्यंत 2 कोटी, 61 लाख, 79 हजार 85 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.