ETV Bharat / bharat

Rahul Gandhi: राहुल गांधी यांचा गुजरात दौरा! पक्षाला आणखी एक धक्का; युवक काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचा आज गुजरात दौरा आहे. ते बूथ-स्तरीय पक्ष कार्यकर्त्यांच्या 'परिवर्तन संकल्प' अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. (Rahul Gandhi visit to Gujarat) त्यानंतर ते साबरमती आश्रमाला भेट देणार आहेत. दरम्यान, दौऱ्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे काल गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ सिंह वाघेला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुजरात काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Sep 5, 2022, 1:13 PM IST

गांधीनगर - गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ सिंह वाघेला यांनी काल रविवार (दि. 5 सप्टेंबर)रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आजच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज सोमवार (दि. 5 सप्टेंबर)रोजी गुजरात दौऱ्याच्या एक दिवस अगोदर वाघेला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Gujarat Youth Congress President Vishwanath Singh Vaghela) वाघेला यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांना पत्र लिहित आपला राजीनामा दिला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा 7 सप्टेंबर रोजी पक्षाच्या 'भारत जोडो यात्रा' सुरू करण्याच्या दोन दिवस आधी गांधींचा हो गुजरात दौरा आहे.

राहुल गांधी यांचा गुजरात दौरा

हा पक्षाला मोठा धक्का - 2 सप्टेंबर रोजी पक्षाचे नेते राजिंदर प्रसाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते नौशेरा राजौरी येथील दिवंगत मास्टर बेली राम शर्मा यांचे चिरंजीव आहेत. (Bharat Jodo Yatra) प्रसाद यांनी 'कोटारी' यंत्रणा हे पक्षावर येणाऱ्या अडचणींचे कारण असल्याचे सांगितले. अलीकडच्या काही महिन्यांत राजिंदर प्रसाद आणि अनेक उच्चपदस्थ नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून बाहेर पडणे हा पक्षाला मोठा धक्का आहे.

कॉंग्रेसच्या प्रमुख युवा नेत्यांपैकी एक - काँग्रेस आपल्या 'भारत जोडो यात्रे'ची तयारी करत असताना, पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून 148 दिवसांची पदयात्रा देशाला पुन्हा एकत्र आणण्याच्या उद्देशाने काश्मीरमध्ये संपेल. आपल्याच नेत्यांना एकसंध ठेवण्यासाठी पक्षाची धडपड सुरू आहे. व्यवसायाने वकील आणि कॉंग्रेसच्या प्रमुख युवा नेत्यांपैकी एक, जयवीर शेरगिल यांनी 24 ऑगस्ट रोजी राजीनामा दिला आणि असा दावा केला की निर्णयकर्त्यांची दृष्टी आता तरुणांच्या आकांक्षेशी सुसंगत नाही.

हार्दिक पटेलनेही पक्षाचा राजीनामा दिला - या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. असंतुष्ट नेत्यांचा तो एक प्रमुख चेहरा आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी केंद्रीय कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनीही फेब्रुवारीमध्ये राजीनामा दिला होता. मे महिन्यात, गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेलनेही पक्षाचा राजीनामा दिला आहे. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोकांनी पक्ष सोडला आहे.

हेही वाचा - Rohit Shetty meets Amit Shah : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी घेतली अमित शहा यांची भे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.