नवी दिल्ली Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाहीत. यावर आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "22 जानेवारीचा कार्यक्रम हा राजकीय आहे", असं ते म्हणाले.
-
#WATCH | On Ram Temple Pran Pratishtha ceremony, Congress MP Rahul Gandhi says, "The RSS and the BJP have made the 22nd January function a completely political Narendra Modi function. It's a RSS BJP function and I think that is why the Congress President said that he would not go… pic.twitter.com/FOCwvm1FBp
— ANI (@ANI) January 16, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | On Ram Temple Pran Pratishtha ceremony, Congress MP Rahul Gandhi says, "The RSS and the BJP have made the 22nd January function a completely political Narendra Modi function. It's a RSS BJP function and I think that is why the Congress President said that he would not go… pic.twitter.com/FOCwvm1FBp
— ANI (@ANI) January 16, 2024#WATCH | On Ram Temple Pran Pratishtha ceremony, Congress MP Rahul Gandhi says, "The RSS and the BJP have made the 22nd January function a completely political Narendra Modi function. It's a RSS BJP function and I think that is why the Congress President said that he would not go… pic.twitter.com/FOCwvm1FBp
— ANI (@ANI) January 16, 2024
धर्माचा फायदा घ्यायचा नाही : "22 जानेवारीचा कार्यक्रम हा राजकीय आहे. आम्ही सर्व धर्मांसोबत आहोत. मला धर्माचा फायदा घ्यायचा नाही. मला त्यात रस नाही. मला माझ्या शर्टवर माझा धर्म घालण्याची गरज नाही. मात्र, ज्याला तिथे जायचे असेल तो जाऊ शकतो. पण त्या दिवशी आम्ही तिथे जाणार नाही. आमच्या पक्षातील कोणीही तिथे जाऊ शकतो. मात्र आम्ही राजकीय कार्यक्रमांना जाणार नाही", अशी भूमिका राहुल गांधींनी मांडली.
नरेंद्र मोदींचा राजकीय कार्यक्रम : "संघ आणि भाजपानं 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदींचा राजकीय कार्यक्रम बनवलाय. हा संघ आणि भाजपाचा कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांनी कार्यक्रमाला जाणार नसल्याचं सांगितलं. आम्ही सर्व धर्मांना मानणारे आणि त्यांचा आदर करणार्यांपैकी आहोत. हिंदू धर्मातील बड्या नेत्यांनीही आपलं मत मांडलंय. त्यांनीही याला राजकीय कार्यक्रम म्हटलं", असं राहुल गांधी म्हणाले.
मी द्वेष पसरवत नाही : "मला वाटतं की, जो खऱ्या अर्थानं धर्मावर विश्वास ठेवतो त्याचं धर्माशी वैयक्तिक नातं असतं. मी माझं जीवन धर्माच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतो. मी लोकांशी योग्य वागतो आणि त्यांचा आदर करतो. मी द्वेष पसरवत नाही", असं राहुल गांधी म्हणाले.
भारत जोडो न्याय यात्रा : राहुल गांधी सध्या 'भारत जोडो न्याय यात्रा' करत आहेत. मणिपूरमधून निघालेली ही यात्रा मुंबईत संपेल. आज या यात्रेचा तिसरा दिवस आहे. या दरम्यान नागालँडमधील कोहिमा शहरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
हे वाचलंत का :