नवी दिल्ली - भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना मदतीचे आवाहन केले. "प्रणाली अपयशी ठरत आहे", असे म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या सहकाऱ्यांना नागरिकांची मदत करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - पीएम केअर फंड : देशातील सरकारी रुग्णालयात कार्यन्वित होणार 551 ऑक्सिजन निर्मिती प्लांट
"प्रणाली अपयशी झाली, आता जन की बात करणे गरजेचे आहे". या संकट काळात देशाला जबाबदार व्यक्तींची गरज आहे. मी काँग्रेसमधील सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की, त्यांनी सर्व राजकीय कामे सोडून देशातील नागरिकांची मदत करावी आणि त्यांचे दुख कमी करावे. हे काँग्रेस कुटुंबाचे धर्म आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले.
देशात ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या रुग्णांची नोंद
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आणि २ हजार ७६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, आता देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही १ कोटी, ६९ लाख ६० हजार १७२ एवढी असून १ लाख ९२ हजार ३११ रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहन एम. शांतनागोदर यांचा मृत्यू