डेहरादून - भाजपच्या विधीमंडळाची बैठक संपली आहे. बैठकीत पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( Pushkar Singh Dhami elected as Chief Minister of Uttarakhand ) नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 23 मार्चला होऊ शकतो.
BJYM चे प्रदेशाध्यक्ष -
ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. भाजपच्या युवा कार्यकर्त्यांवर त्यांची चांगली पकड असल्याचे मानले जाते. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची भाजपची रणनीतीही असू शकते. ही रणनीती 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रंग दाखवेल.
खटीमाचे दोन वेळा आमदार, तिसऱ्यांदा पराभूत -
धामी हे उधम सिंह नगर जिल्ह्यातील खातिमा विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार होते. मात्र, यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भगतसिंग कोश्यारी आणि राजनाथसिंह यांच्या जवळचे -
धामी हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांचे निकटवर्तीय मानले जातात. कोश्यारी हे आता सक्रिय राजकारणात नाहीत आणि सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. lसेच धामी हे राजनाथ सिंह यांचेही जवळचे मानले जातात.
पिथौरागढमध्ये जन्म पण खाटीमा कर्मभूमी -
धामीचा जन्म पिथौरागढच्या कनालीचीना येथे झाला. त्यांचे वडील सैन्यात सुभेदार होते. धामी खाटीमाला त्यांची कर्मभूमी सांगतात.