डेहराडून - घटनात्मक पेचात सापडलेल्या तीर्थ सिंह यांना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अशा स्थितीत केवळ ४६ वर्षांचे असलेले पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री होणार आहेत.
पुष्कर सिंह धामी यांनी लखनौ विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. अखिल भारतीय विद्यापरिषदेत ते लोकप्रिय ठरलेले नेते आहेत. सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी जवळीक असल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळणे आणखी सोपे ठरले आहे.
हेही वाचा-अनिल देशमुख दिल्लीला गेलेच नाहीत अन् त्यांना तिसरा समन्सही मिळाला नाही - अॅड. इंद्रपाल सिंग
अखिल भारतीय परिषदेकरिता सक्रिय काम-
लखनौ विद्यापीठात असताना धामी यांनी सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली होती. उत्तराखंडमधून (पूर्वीचे पहाड) येणाऱ्या मुलांना ते खूप मदत करत असत. त्यांनी १९९० ते १९९९ पर्यंत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
संबंधित बातमी वाचा-पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी निवड; रविवारी घेणार पदाची शपथ
एबीव्हीपीच्या राष्ट्रीय संमेलनाने राजनाथ सिंह झाले होते प्रभावित
लखनौमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संमेलन झाले होते. या संमेलनाचे संयोजक आणि संचालक म्हणून पुष्कर सिंह धामी यांनी काम पाहिले होते. त्यांच्या नियोजनाने भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह हे प्रभावित झाले होते.
हेही वाचा-'कोरोनीलची जाहिरात करण्याकरिता बाबा रामदेव यांनी चुकीचा प्रोपागंडा वापरला'
उत्तराखंडमध्ये भाजपची संघटनबांधणी
उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्यानंतर धामी यांनी राज्याच्या राजकारणात मजबूत स्थान निर्माण केले. धामी हे प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन काम करणारे नेते मानले जातात. त्यांनी २००२ ते २००८ मध्ये सलग सहा वर्षे फिरून बेरोजगार तरुणांचे संघटन केले. राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना ७० टक्के आरक्षण मिळवून देण्यात त्यांना यश आले. काँग्रेसच्या काळात त्यांनी काढलेला मोर्चा हा युवा शक्ति प्रदर्शन म्हणून ओळखला जातो. २०१२ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी रीतसर राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर पुष्कर सिंह धामी यांनी मागे वळून पाहिले नाही. केवळ ४६ व्या वर्षी धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले आहेत.
सतीष लखेडा यांच्याबरोबर आहे मैत्री
भाजपच्या मीडिया टीमचे सदस्य सतीश लखेडा आणि पुष्कर सिंह धामी यांच्यात चांगली मैत्री आहे. हे दोघेही लखनै विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. तेव्हा दोघेही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. सतीष लखेडा हे चमोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते सातत्याने लोकांबरोबर बैठका घेत आहेत. आरोग्य केंद्रात आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देत आहे. येत्या काळात उत्तराखंडच्या राजकारणामध्ये तरुणांना महत्त्व मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.