ETV Bharat / bharat

पंजाब सरकारकडून 2.85 लाख शेतमजूर आणि भूमिहीन शेतकऱ्यांना कर्जमाफी - मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

कर्जमाफी योजना ही मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी वर्गाचे कर्जमाफ करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
author img

By

Published : Jul 14, 2021, 6:04 PM IST

चंदीगड - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाब सरकारने शेतकऱ्यांना खूश केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतमजूर आणि भूमिहीन शेतकऱ्यांकरिता कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेमुळे पंजाबमधील 2.85 लाख शेतमजूर आणि भूमिहीन शेतकऱ्यांचे 590 कोटी रुपयांचे कर्जमाफ होणार आहे.

कर्जमाफी योजना ही मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी वर्गाचे कर्जमाफ करण्यात येत आहे. प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे (पीएसीएस) सदस्य असलेल्या 2,85,325 सदस्याचं 590 कोटींचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याला सुमारे 20 हजार रुपयांचा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा-पाकिस्तानात बसमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट, 9 चिनी नागरिकांसह 13 ठार

निवडणुकीत काँग्रेसने कर्जमाफीचे दिले होते आश्वासन-

कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना 20 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमात धनादेश देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 5.64 लाख शेतकऱ्यांचे 4624 कोटी रुपयांचे कर्जमाफ कऱण्यात आले आहे. पंजाब काँग्रेसने 2017 मधील विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याचाच भाग म्हणून पंजाब सरकार कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करत आहे.

हेही वाचा-बाई, बुब्स आणि ब्रा : हेमांगी कवीच्या पोस्टवर चर्चेचे धुमशान

विशेष मागासवर्ग आणि मागास प्रवर्गाचेही कर्ज होणार माफ-

विशेष मागासवर्ग आणि मागास प्रवर्गातील लोकांचे 50 हजार रुपयापर्यंतचे कर्ज निर्लेखित करण्यात येणार आहे. या योजनेत एसी महामंडळाच्या 6405 लाभार्थ्यांचे 58.39 कोटी रुपयांचे कर्जमाफ होणार आहे. तर बीसी महामंडळाच्या 1225 लाभार्थ्यांचे 20.71 कोटी रुपयांचे कर्जमाफ होणार आहे.

हेही वाचा-DA hike केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ!

कर्जमाफी योजना लागू-

पंजाब सरकारने शेतमजूर आणि भूमीहीन शेतकऱ्यांसाठी (PACS 2019) कर्जमाफी योजना लागू केली आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी संस्थांकडून कृषी सहकारी सोसायट्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीचा समावेश आहे. कृषी सहकारी सोसायट्यांकडून शेतमजूर आणि भूमीहीन शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येते. कर्जमाफीचा निर्णय घेण्याच्या बैठकीत पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल, सहकार मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा, अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) अनिरुद्ध तिवारी आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.