अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील राणिप येथून मतदान केले. तर नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा देखील मतदानासाठी पोहोचल्या. (Narendra Modi mother Hiraba cast her vote). त्यांनी गांधीनगर दक्षिण जागेसाठी मतदान केले. 100 वर्षीय हिराबा व्हीलचेअरवर बसून मतदानासाठी आल्या होत्या. (Gujrat Election 2022)
मोदी यांनी कुटुंबियांची घेतली भेट : नरेंद्र मोदी यांनी आई हीराबाला भेटण्यासाठी विमानतळावरून थेट गांधीनगर रायसन गाठले. त्यांची भेट घेऊन ते कमलममध्ये पोहोचले. येथे आज त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आणि इतर नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणिप निशान एज्युकेशन कॉम्प्लेक्स (गुजरात विधानसभा निवडणूक 2022 दुसरा टप्पा) येथे मतदान केल्यानंतर त्यांचे भाऊ सोमाभाई मोदी यांची देखील भेट घेतली. ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांच्या भावाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले तेव्हा त्यांचाशी केवळ कौटुंबिक चर्चा झाली. देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. गुजरातचा सातत्यपूर्ण विकास सुरू ठेवण्यासाठी भाजपला मतदान करणे आवश्यक आहे, असे देखील ते म्हणाले.