ETV Bharat / bharat

Policeman Saved Elders Life : दलदलीत फसलेल्या ज्येष्ठाचे पोलिसाने वाचविले प्राण, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

आगरा येथील एका तलावात अडकलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचे प्राण पोलिसाने वाचविले ( policeman saved life of elder ). दलदलीत अडकलेली ही व्यक्ती बराच वेळ त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, पाणी खोलवर असल्याने त्यांना बाहेर निघणे शक्य नव्हते. अखेर हा पोलिस देवदूताप्रमाणे आल्याने त्या ज्येष्ठाचे प्राण वाचले. आग्रा येथील बहरन पोलिस ठाणे परिसरात ( Incident in Barhan Police Thane area ) ही घटना घडली होती.

policeman-saved
policeman-saved
author img

By

Published : Jul 2, 2022, 9:41 PM IST

आग्रा - आग्रा येथील बहरन पोलिस ठाणे परिसरात ( Incident in Barhan Police Thane area ) राष्ट्रीय कॉलेजच्या समोर असलेल्या तलावात एक ज्येष्ठ नागरिक दलदलीत फसले होते. ते दलदलीत अडकल्याचे कळताच तेथील नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अग्निशमन दलाचे पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता एका पोलिस जवानाने स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता त्या दलदलीमध्ये उडी घेत त्या ज्येष्ठाचे प्राण वाचविले ( Policeman Saved Elders Life ). या पोलिसाची हिमतीला दाद देत नागरिकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

दलदलीत फसलेल्या ज्येष्ठाचे पोलिसाने वाचविले प्राण

दोरखंडाच्या साह्याने उतरला दलदलीत - शुक्रवारी दुपारी बरहन पोलिस ठाण्याच्या पोलिसांना माहिती मिळाली की, एक वयस्कर व्यकीत राष्ट्रीय इंटर कॉलेजसमोर असलेल्या तलावातील दलदलीत फसला आहे. ही माहिती मिळताच फायर बिग्रेडच्या जवानांसहित पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळाकडे धावले. या पोलिस स्टेशनमधील शिपाई संदेश कुमार हा मोठ्या हिमतीने कमरेला दोरखंड बांधून दलदलीत उतरला. तलावाच्या काठावर अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी हा दोरखंड घट्ट पकडून ठेवला होता.

जीवावर बेतले होते - तलावाच्या काठापासून सुमारे 20 फूट आत ही वयस्कर व्यक्ती दलदलीत फसली होती. संदेश कुमारने बहादुरी दाखवत तो तिथपर्यंत पोहोचला. या ज्येष्ठ नागरिकास धीर देत त्याने काठावर आणले. या मदतकार्या दरम्यान एकवेळ अशी आली होती की, दलदलीत अडकलेली व्यक्ती आणि संदेश कुमार दोघेही दलदलीत आणखी खोल अडकत चालले होते. त्यामुळे तिथे उपस्थित पोलिसांसहित अन्य नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शर्थीच्या प्रयत्नानंतर दोघांनाही दोरीच्या साह्याने खेचून काठावर आणले गेले. त्यानंतर त्या ज्येष्ठ व्यक्तीला उपचारासाठी नजिकच्या एत्मादपूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना आग्र्याच्या एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले.

हेही वाचा Transgender Working as Security Guards : पिंपरी-चिंचवडमध्ये तृतीयपंथी करता आहेत सुरक्षा रक्षकाच काम; पालिकेचा कौतुकास्पद निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.