मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द करण्यात आला. (Raining In Bathinda When The PM Landed) पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारची सभा रद्द करण्यात आली. (PM Security Breach In Panjab) त्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले. (Raining In Bathindan Punjab Tour) केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता. पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हेदेखील या रॅलीत सहभागी होणार होते.
राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते
गृहमंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, (Raining In Bathindan Punjab Tour) "बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे दाखल झाले, तेथून ते हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पीएम मोदींना सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती."
कोणत्याही अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेले नाही
पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्याने त्याची जबाबदारी निश्चित करून फिरोजपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरमन हंस यांना निलंबित करण्यात आले. तसे तोंडी आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. मात्र, काही वेळातच हे आदेश मागे घेण्यात आले. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना विचारले असता त्यांनीही कोणत्याही अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेले नाही, असे सांगितले. त्यामुळे पडद्यामागे नेमके काय घडले, हा प्रश्न विचारला जात आहे.
काँग्रेसच्या समर्थकांचा मोदींच्या सभेला गर्दी नसल्याने सभा रद्द केल्याचा दावा
मोदींचा ताफा अडवल्याने त्यांची सभाच रद्द करावी लागली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षेमधील या गोंधळासंदर्भात पंजाबमधील काँग्रेस सरकारकडून अहवाल मागवला आहे. मात्र, त्याचवेळी काँग्रेसच्या समर्थकांकडून आता मोदींच्या सभेला गर्दीच नसल्याने सुरक्षेचे कारण देऊन सभा रद्द करण्यात आल्याचा दावा सोशल नेटवर्किंगवरुन केला जातोय.
भटिंडामध्ये पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली
मोदींच्या या सभेच्या आधीच आज पंजाबमध्ये पाऊस सुरु झाला. पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने जाण्याच्या नियोजित कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला. भटिंडामध्ये पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. मात्र, त्यांचा ताफा हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावरील फ्लायओव्हरवर अडवण्यात आला होता.
हेही वाचा - Sindhutai Sapkal : अनाथांच्या दु:खांवर फुंकर घालणारी माय हरपली, ईटीव्ही भारतकडून भावपूर्ण श्रद्धांजली!