देवघर - पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ( 12 जून ) रोजी देवघर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी प्रथम देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, त्यानंतर 10 किमी लांबीचा रोड शो करत भगवान भोलेनाथांच्या दरबारात पोहोचले. यावेळी त्यांनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत, पूजा- अर्चां केली. तसेच, भगवान भोलेनाथाला जलाभिषेक केला. मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधान मोदी देवघर कॉलेजच्या मैदानावरील आभार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना ( PM Modi In Baba Baidyanath Dham ) झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात त्यांनी देवघर विमानतळाचे उद्धाटन केले. त्यानंतर त्यांनी 10 किलोटमीटर लांब रोड शो केला. या रोड शो नंतर पंतप्रधानांनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी सुमारे 16,800 कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने उडान योजनेंतर्गत गेल्या ५-६ वर्षांत सुमारे ७० विमानतळ, हेलिपोर्ट बांधण्यात आले.
हेही वाचा - PM Modi In Jarkhand : देवघर विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी केला रोड शो; पहा व्हिडीओ