ETV Bharat / bharat

Narendra Modi At Kashi Vishwanath : मोदींच्या हस्ते आज काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण होणार - काशी विश्वनाथ कॉरिडॉर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं (PM Modi to inaugurate Kashi Vishwanath Corridor) आज लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी वाराणसी नगरी सजली आहे.

काशी विश्वनाथ कॉरिडॉर
Kashi Vishwanath Corridor
author img

By

Published : Dec 13, 2021, 7:48 AM IST

Updated : Dec 13, 2021, 12:24 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi )सोमवारी उत्तर प्रदेशातील संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे ( Kashi Vishwanath Corridor ) पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण (PM Modi to inaugurate Kashi Vishwanath Corridor) करण्यात येणार आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरमुळे काशीच्या आध्यात्मिक चैतन्यात भर पडेल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

उद्याचा 13 डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. श्री काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन केले जाईल. यामुळे काशीच्या आध्यात्मिक चैतन्यात भर पडेल. मी तुम्हा सर्वांना उद्याच्या कार्यक्रमात सामील होण्याचे आवाहन करतो," असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी (Kashi Vishwanath Corridor inauguration) वाराणसी नगरी सजली आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. लोकार्पणचा हा सोहळा जवळपास तीन तास चालणार आहे. आज पंतप्रधान मोदी या कार्यक्रमानंतर 2500 मजुरांसोबत भोजन करणार असल्याची देखील माहिती आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्घाटनाच्या तयारीचा आढावा घेतला आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा काशीला नवी ओळख देईल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तर 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वननाथ कॉरिडॉरचं भूमीपूजन करण्यात आलं होतं.

असा असेल मोदींचा वाराणसी दौरा?

पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कालभैरव मंदिराला भेट देतील.

13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता रो-रो जहाजातून गंगा आरतीचे साक्षीदार होतील.

14 डिसेंबर रोजी, दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील.

Last Updated : Dec 13, 2021, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.