ETV Bharat / bharat

आरोग्याच्या पायभूत सुविधा बळकट करा, पंतप्रधानांचे महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन - high positivity rate

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनाच्या परिस्थितीबाबत संवाद साधला. यावेळी पंतप्रधान म्हणाले, की की ग्रामीण भागावर लक्ष देण्याची गरज आहे.

PM Modi urges CMs of six state
पंतप्रधानांचे महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन
author img

By

Published : Jul 16, 2021, 3:18 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाधितांचे अधिक प्रमाण असलेल्या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुक्रवारी संवाद साधला. केंद्राने जाहीर केलेल्या 23 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करा, असा पंतप्रधानांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनाच्या परिस्थितीबाबत संवाद साधला. यावेळी पंतप्रधान म्हणाले, की की ग्रामीण भागावर लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा-श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान

केंद्र सरकारने कोरोनाच्या लढ्याविरोधात 23 हजार कोटींचे आपतकालीन पॅकेज जाहीर केले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या पॅकेजचा राज्यांनी वापरू करून आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधा बळकट करायला पाहिजे. पायाभूत सुविधांमधील दरी दूर करण्याची गरज आहे. तसेच ग्रामीण भागावर लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा-नवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधींची भेट

एकूण कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के प्रमाण सहा राज्यांमध्ये

देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के प्रमाण सहा राज्यांमध्ये असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यामुळे या राज्यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना पावले उचलावीत असा पंतप्रधानांनी सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला. टेस्ट-ट्रॅक-ट्रिट-व्हॅक्सिन यावर राज्यांनी लक्ष केंद्रित करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनाच्या स्थितीबाबत संवाद साधला होता.

हेही वाचा-मध्यप्रदेशातील विदिशामध्ये विहिरीचा कठडा तुटला; चौघांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

असे आहे २३ हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज

  • केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी जुलै 2021 मध्ये आर्थिक पॅकेज जाहीर केले. एप्रिल 2020 मध्ये कोव्हिडकरिता पहिल्या पॅकेजमध्ये 15 हजार कोटी रुपये देण्यात आले होते.
  • कोरोना रुग्णालयांची संख्या 163 ने वाढून 4,389 झाली आहे. तर ऑक्सिसजन बेड हे 50 हजारांवरून 4,17,396 करण्यात आले आहे. भविष्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी 23 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.
  • केंद्र सरकारकडून 15 हजार कोटी तर राज्य सरकारे 7 हजार कोटी रुपये देणार आहे. 736 जिल्ह्यांत बाल उपचार विभाग सुरू करण्यात येणार आहेत. तर 20 हजार आयसीयू बेड सुरू करण्यात येणार आहेत.
  • प्रत्येक जिल्ह्यात 10 हजार लिटर ऑक्सिजनच्या साठवण क्षमतेची व्यवस्था केली जाणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यात एक कोटी रुपये किमतीच्या औषधांचा अतिरिक्त साठा केला जाणार आहे. 23 हजार कोटी रुपयांचे हे पॅकेज पुढील 9 महिन्यांत अमलात आणण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.