नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवासी भारतीय दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे व्हर्च्युअली उद्घाटन करणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी ९ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला आहे.
प्रवासी भारतीय दिनानिमित्ती दरवर्षी परराष्ट्र मंत्रालयाकडून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांशी या निमित्ताने संवाद साधला जातो. कोरोना महामारीत ही परिषद व्हर्च्युअली आयोजित करण्यात आली आहे. 'भारत को जानिये, या प्रश्नमजुंषेचेही आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात हा कार्यक्रम होणार असून विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.