सूरत PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातला भेट देणार आहेत. सूरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठा असलेल्या सूरत डायमंड बाजाराचं उद्घाटन करणार आहेत. सूरत डायमंड बाजार 35.54 एकर जागेवर पसरला आहे. तब्बल 3 हजार 400 कोटी रुपये खर्चून सूरत डायमंड बाजार उभारण्यात आला आहे. हिऱ्यांसाठी जगातील सगळ्यात मोठा हिरे बाजार आधुनिक सुविधांसह सज्ज झाला असून सूरतमध्ये विशेष अधिसूचित क्षेत्रावर तो उभारण्यात आला आहे.
हिरे व्यापाऱ्यांसह अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती : जगातील सगळ्यात मोठा हिरे बाजाराचं सूरतमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, डायमंड संघटनेचे अध्यक्ष वल्लभ लखानी, संचालक माथूर सवानी, गोविंद ढोलकिया, लालजी पटेल, सूरत डायमंड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दिनेश नावडिया आदींसह हिरे व्यापारातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
हिरे व्यापार्यांसाठी जागतिक दर्जाचं केंद्र : आंतरराष्ट्रीय हिरे व्यापार्यांसाठी जागतिक दर्जाचं केंद्र स्थापन करणं. राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत थेट योगदान देणं. नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणं या प्राथमिक उद्देशानं सूरत डायमंड बाजार विकसित करण्यात आला आहे. भारतातून हिरे, दागिन्यांची आयात, निर्यात आणि व्यापार सुलभ करणं सूरत डायमंड बाजाराचं उद्दिष्ट आहे.
67 हजार व्यापारी, ग्राहकांना करता येतो व्यवहार : सूरत डायमंड बाजार हा जगातील सगळ्यात मोठं हिरे व्यापाराचं केंद्र आहे. त्यामुळं इथं येणाऱ्या व्यापारी आणि ग्राहकांसह 67 हजार नागरिकांना व्यवहार करता येतो. कंपनीनं प्रवेश गेटवर चेकपॉईंट, घोषणा यंत्रणा आणि कार स्कॅनरसह सुरक्षा उपाय करण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
4 हजार 500 हिरे व्यापाऱ्यांची कार्यालये : सूरत हिरे व्यापार केंद्र हे आधुनिक सोयी सुविधांनी युक्त आहे. सूरत हिरे बाजारात 67 लाख चौरस फूट बांधकाम करण्यात आलं आहे. त्यामुळं 4 हजार 500 पेक्षा जास्त हिरे व्यापार कार्यालय इथं पहायला मिळतात. या सूरत हिरे बाजारात असलेल्या इमारतींचं निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम देशील आहे. डायमंड ट्रेडिंग हबची कार्यालये 300 स्क्वेअर फूट ते 1,लाख स्क्वेअर फूट अशा विविध आकारात उपलब्ध आहेत. प्रत्येक मजल्यावर जोडणारा स्ट्रक्चरल पूल 1 हजार 407 फूट लांबीचा आणि किमान 24 फूट रुंदीचा आहे.
हेही वाचा :