ETV Bharat / bharat

PAYTM CASHBACK मिळणार प्रत्येक व्यवहारावर, जाणून घ्या अधिक माहिती - पेटीएम कॅशबॅक

जर तुम्हाला मोबाईल अॅपवरून आर्थिक व्यवहार करताना काही कॅशबॅक मिळाली तर...पेटीएमने ग्राहक व व्यापारी या दोघांसाठीही हमखास कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे.

Paytm
पेटीएम
author img

By

Published : Jul 2, 2021, 3:33 PM IST

नवी दिल्ली - तुम्ही जर आर्थिक व्यवहारासाठी डिजीटल अॅप वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. डिजीटल देयक व्यवहार कंपनी पेटीएमने ५० कोटी रुपयांची कॅशबॅक मोहिम जाहीर केली आहे. देशात डिजीटल इंडियाची सहा वर्षे पूर्ण होत असल्याने पेटीएमने व्यापारी आणि ग्राहकांकरिता कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमधून व्यापारी व ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर कॅशबॅक मिळणार आहे.

पेटीएमने देशातील २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पेटीएमची ऑफर जाहीर केली आहे. विशेषत: कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणासाटी विशेष ऑफर आहेत. डिजीटल देयक व्यवहाराची पद्धत स्वीकारण्यात देशातील व्यापाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. हे व्यापारी आजवर पेटीएमच्या समुदायाचा भाग झाले आहेत.

हेही वाचा- जुगार अड्ड्यावर छापा; 25 जणांसह भाजपा आमदाराला रंगेहाथ पकडलं

अशी आहे कॅशबॅक ऑफर योजना-

  • जे व्यापारी रोज पेटीएम वापरतात अशा २ कोटीहून अधिक व्यापाऱ्यांसाठी ५० कोटी रुपयांची कॅशबॅक ऑफर कंपनीने जाहीर केली आहे.
  • दिवाळीपूर्वी पेटीएम अॅपचा वापर करून जे व्यापारी सर्वाधिक व्यवहार करणार आहेत, त्यांना प्रमाणपत्र व बक्षीस दिले जाणार आहे. त
  • सेच त्यांना मोफत साउंडबॉक्स, आयओटी डिव्हाई आणि अशी बक्षीसे दिली जाणार आहेत.
  • कंपनीच्या माहितीनुसार जे ग्राहक पेटीएम क्यूआरकोडचा वापर करून दुकानांमधून खरेदी करतात त्यांना प्रत्येक व्यवहारावर कॅशबॅक दिली जाणार आहे.
  • डिजीटल इंडिया मोहिम ही देशाच्या अर्थव्यवस्थेला वाढण्यासाठी योगदान देईल, असा पेटीएमने विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा- आता पुन्हा राडा; PUBG चं भारतात कमबॅक, भारतीय व्हर्जन 'बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया' अधिकृतपणे लाँच

कंपनीचे सीईओ सांगतात...

पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा म्हणाले, की डिजीटल इंडिया यशस्वी करण्यासाठी व भारताच्या योगदानात व्यापाऱ्यांनी काम केले आहे. त्यांची दखल घेण्यासाठी गॅरंटेड कॅशबॅक ऑफर आहे.

काय आहे पेटीएमचा साउंडबॉक्स

मोबाईल अॅपमधून व्यवहार केल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी व्यापाऱ्यांना साउंबॉक्स उपयोगी पडतात. हे साउंडबॉक्स पात्र व्यापाऱ्यांना ५० टक्के सवलतीत दिले जाणार असल्याचेही कंपनीचे सीईओ शर्मा यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.