ETV Bharat / bharat

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस, सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात

Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (11 डिसेंबर) सहावा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राज्यसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन महत्त्वाची विधेयकं मांडणार आहेत. त्यासोबतच आज विविध मुद्द्यांवरुन सभागृहात गदारोळ होऊ शकतो. दरम्यान, सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे.

parliament winter session 2023 sixth day
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 1:24 PM IST

नवी दिल्ली Parliament Winter Session 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (11 डिसेंबर) दुपारी राज्यसभेत जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2023 सादर करतील. तसंच काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी आणि जनता दल (यू) चे अनिल प्रसाद हेगडे हे जलसंपदा विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीच्या (2023-24) दोन अहवालांची (इंग्रजी आणि हिंदीमध्ये) प्रत्येकी एक प्रत राज्यसभेत सादर करतील.

भाजपा खासदारांची काँग्रेसविरोधात घोषणाबाजी : संसदेच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहाच्या बाहेर भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, ओडिसा आयटी छाप्यांमध्ये काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित असलेल्या जागेतून 300 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त करण्यात आल्यानंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी काँग्रेसविरोधात आंदोलन केलं.

  • Winter Session of Parliament | Bharatiya Janata Party MPs Baburam Nishad and Satish Chandra Dubey are to lay on the table, a copy of the Thirty-Third Report of the Department-related Parliamentary Standing Committee on Consumer Affairs, Food and Public Distribution (2023-2024) on…

    — ANI (@ANI) December 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अन्न आणि सार्वजनिक वितरण विषयक अहवालाची प्रत सादर करणार : भारतीय जनता पक्षाचे खासदार बाबुराम निषाद आणि सतीश चंद्र दुबे हे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण (2023-24) विषयक संसदीय स्थायी समितीच्या 33 व्या अहवालाची प्रत आज सादर करतील. तसंच भारतीय जनता पक्षाचे खासदार सुशील कुमार मोदी, द्रविड मुनेत्र कडगमचे खासदार विल्सन आणि तेलगू देशम पक्षाचे खासदार कनकमेदाला रवींद्र कुमार विभागाशी संबंधित सार्वजनिक संसदीय स्थायी समितीच्या सात अहवालांपैकी प्रत्येकी (इंग्रजी आणि हिंदीमध्ये) एक प्रत सादर करणार आहेत.

  • Winter Session of Parliament | Union Home Minister Amit Shah will introduce the Jammu and Kashmir Reservation (Amendment) Bill, 2023 and the Jammu and Kashmir Reorganisation (Amendment) Bill, 2023 in Rajya Sabha today afternoon.

गदारोळ होण्याची शक्यता : दरम्यान, आज संसदेत विरोधकांकडून गदारोळ होऊ शकतो. आचार समितीचा अहवाल वाचण्यासाठी वेळ देण्यात आला नसल्याचा आरोप काही विरोधी खासदारांनी केला. त्याचबरोबर महुआ मोइत्राचा मुद्दाही आज उपस्थित केला जाऊ शकतो. यापूर्वी या प्रकरणी निर्णय झाल्यानंतर सभागृहात गदारोळ झाला होता. अन्याय सहन करणार नाही, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या होत्या. तसंच गदारोळामुळं सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं होतं.

हेही वाचा -

  1. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस, मोईत्रा यांची खासदारकी होणार रद्द?
  2. संसदेचं हिवाळी अधिवेशन 2023 ; भाजपाच्या संसदीय समितीची आज बैठक, तर काँग्रेसनं लोकसभेत दिला स्थगन प्रस्ताव
  3. Assembly Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनाचं कामकाज स्थगित; गळ्यात संत्र्यांचा माळा घालून पायऱ्यांवर आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.