नवी दिल्ली: भारत जोडो यात्रेदरम्यान लोकांनी मला विचारले की, 2014 ते 2022 दरम्यान अदानीची एकूण संपत्ती USD 8 अब्ज वरून USD 140 अब्ज कशी झाली?, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारणा केली आहे. लोकसभेत ते बोलत होते.
अदानी मुद्द्यावर चर्चेच्या मागणीवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचपैकी तीन दिवस ठप्प झाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवसाच्या कामकाजापूर्वी, सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणार्या भाजप संसदीय पक्षाची विरोधकांना घेरण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषणाला उभे राहून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
लोकसभेत राहुल गांधींनीही अदानी मुद्द्यावरून निशाणा साधला. राहुल म्हणाले की, यात्रेदरम्यान लोकांनी मला विचारले की अदानींनी इतक्या क्षेत्रात एवढे यश कसे मिळवले, त्यांचा पंतप्रधानांशी काय संबंध आहे? राहुल म्हणाले, '2014 मध्ये अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 609 व्या क्रमांकावर होते, जादू झाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आले. लोकांनी विचारले की हे यश कसे मिळाले? आणि त्याचा भारताच्या पंतप्रधानांशी काय संबंध आहे? मी म्हणतो, हे नाते अनेक वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते.
'अदानींसाठी नियम बदलले': राहुल म्हणाले 'अदानी विमानतळासाठी नियम बदलले, नियम बदलले गेले आणि नियम कोणी बदलले, हे महत्त्वाचे आहे. विमानतळ व्यवसायात नसेल तर तो विमानतळ ताब्यात घेऊ शकत नाही, असा नियम होता. भारत सरकारने अदानीसाठी हा नियम बदलला आहे. अनेक विमानतळं त्यांना चालवण्यास देण्यात आली. अदानींसाठी भारत सरकारने हे सगळे नियम बदलले आहेत असे दिसते.
काय आहे अदानी आणि पीएम मोदींचे संबंध : राहुल गांधी यांनी अदानींच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आणि म्हणाले की, आज तुम्ही कोणत्याही रस्त्याने चालत असाल आणि तो कोणी बांधला असे विचारले तर अदानींचे नाव पुढे येईल. हिमाचलचे सफरचंद अदानीचे आहे. देशाला जाणून घ्यायचे आहे की, अदानी यांचे पंतप्रधानांशी कसे संबंध आहेत. त्यांनी पीएम मोदींचे जुने चित्र समोर आणले, त्याविरोधात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. स्पीकर ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखले आणि तसे न करण्यास सांगितले. अदानी 2014 मधील 609 व्या क्रमांकावरून इतक्या कमी कालावधीत दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदीजी दिल्लीत आल्यावर खरी जादू सुरू झाली, असे गांधी म्हणाले.