ETV Bharat / bharat

Parliament Budget Session : लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब - अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात एकाही दिवशी सभागृहाचे कामकाज शांततेत पार पडू शकले नाही. राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या कारवाईविरोधात काँग्रेसने संसदेत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Parliament Budget Session
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023
author img

By

Published : Mar 28, 2023, 11:09 AM IST

Updated : Mar 28, 2023, 11:44 AM IST

नवी दिल्ली : गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज आजचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवणे आणि त्यांचे दिल्लीतील अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस यावरून आज संसदेत विरोधक आणि सरकार यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला. केंद्र सरकार त्यांना लक्ष्य करण्याची घाई करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केला आहे. सोमवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी काळे कपडे घालून संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला होता. त्यानंतर त्यांनी संसदेच्या संकुलात निदर्शने करत विजय चौकापर्यंत मोर्चा देखील काढला.

बीआरएस खासदारांचा संसदेत स्थगन प्रस्ताव : बीआरएस खासदारांनी संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी करत स्थगन प्रस्ताव मांडला आहे. स्थगन प्रस्तावात खासदारांनी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बीआरएस पक्षाच्या आमदार कविता महिला आरक्षण विधेयक आणण्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. सभागृहातील रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसने आज सकाळी 10:30 वाजता संसदेतील काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यालयात राज्यसभा आणि लोकसभा खासदारांची बैठक बोलावली आहे.

भाजपकडून गदारोळाचा निषेध : सत्ताधारी भाजपने सोमवारी संसदेत विरोधकांनी केलेल्या गदारोळाचा निषेध केला. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी काँग्रेसने खालच्या स्तराचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. सोमवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनीही काँग्रेस खासदारांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, काळे कपडे घालून संसदेत पोहोचणे आणि लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ करणे याला काही अर्थ नाही.

मनीष तिवारी यांचे पत्र : काँग्रेसचे खासदार आणि अर्थविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य मनीष तिवारी यांनी समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार जयंत सिन्हा यांना पत्र लिहून अदानी समूहावर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांची समितीने चौकशी करावी, अशी सूचना केली आहे. गौरव गोगोई आणि प्रमोद तिवारी यांच्यासह मनीष तिवारी यांनीही स्वाक्षरी केलेल्या या पत्रात समितीने सेबी, आरबीआय, एलआयसी, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि इतर नियामक संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी असे सुचवले आहे.

हेही वाचा : Austrian Paraglider Rescued : हिमाचलमध्ये ऑस्ट्रियन पॅराग्लायडर झाडावर लटकला, पोलिसांनी केली सुटका

Last Updated : Mar 28, 2023, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.