ETV Bharat / bharat

Parag Agrawal - भारतीय वंशाचे पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ होणार, जॅक डॉर्सी यांचा राजीनामा

author img

By

Published : Nov 30, 2021, 12:34 AM IST

Updated : Nov 30, 2021, 3:31 AM IST

सोशल मीडिया जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी ( Jack Dorsey resign ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी पराग अग्रवाल ( Parag Agrawal new CEO of Twitter ) ट्विटरचे नवीन सीईओ असतील.

Parag Agarwal new CEO of Twitter
पराग अग्रवाल ट्विटर

नवी दिल्ली - सोशल मीडिया जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी ( Jack Dorsey resign ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी पराग अग्रवाल ( Parag Agrawal new CEO of Twitter ) ट्विटरचे नवीन सीईओ असतील. ट्विटरने ( CEO of Twitter ) आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक नवनवीन प्रयोग केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

जॅक डॉर्सी
जॅक डॉर्सी

हेही वाचा - 12 Rajya Sabha MPs suspended : राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन; महाराष्ट्रातील 'या' खासदारांचा समावेश

ट्विटरकडून एक पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्रात जॅक डॉर्सी यांनी म्हटले की, त्यांनी ट्विटरमध्ये अनेक पदांवर काम केले. आधी को फाउंडर ते सीईओची भूमिका निभावली. त्यानंतर चेयरमन पदावर राहिले. नंतर एक्जीक्यूटिव्ह चेयरमेन, त्यानंतर अंतरिम सीईओच्या पदाची जबाबदारी पार पाडली.

आपण सीईओ म्हणून जवळपास १६ वर्षांपर्यंत काम केले, मात्र आता आपण कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे माझे उत्तराधिकारी म्हणजेच, पराग अग्रवाल नवे सीईओ असतील, असे डॉर्सी म्हणाले.

कोण आहेत पराग अग्रवाल ?

पराग अग्रवाल हे सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) आहेत. डॉर्सी २०२२ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत संचालक मंडळावर राहतील. सीईओ नियुक्त केल्यानंतर अग्रवाल यांनी ट्विटरवरून आभार व्यक्त केले आहे. सीईओ पदावर नियुक्ती झाल्याबाबत आनंदी असल्याचे सांगत त्यांनी डॉर्सी यांचे त्यांचे नियमित मार्गदर्शन आणि मैत्रीसाठी आभार मानले आहे.

पराग अग्रवाल आईआईटी - बॉम्बे, स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी

पराग अग्रवाल हे आईआईटी - बॉम्बे आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११ पासून ट्विटरमध्ये काम करत आहेत आणि २०१७ पासून ते कंपनीचे सीटीओ आहेत. जेव्हा ते कंपनीत रुजू झाले होते तेव्हा कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारपेक्षाही कमी होती.

डॉर्सी यांनी आपल्या ट्विटर पेजवर टाकलेल्या एका पत्रात लिहिले की, कंपनी सोडण्याबाबत ते खूप नाराज परंतु, खूप खूश देखील आहेत आणि हा त्यांचा स्वत:चा निर्णय आहे. या अगोदर डॉर्सी यांनी पद सोडल्याच्या वृत्तानंतर ट्विटरच्या शेअर्समध्ये वृद्धी झाली होती.

Parag Agarwal new CEO of Twitter
पत्र

डॉर्सी यांनी रविवारी ट्विटरवर लिहिले होते की, मला ट्विटर खूप प्रिय आहे. डॉर्सी स्क्वॉयर नावाच्या दुसऱ्या कंपनीचे देखील उच्च अधिकारी आहेत. त्यांनी या आर्थिक पेमेंट सेवा प्रदाता कंपनीची स्थापना केली होती.

हेही वाचा - Winter Session of Parliament : अखेर लोकसभेत तीन कृषी कायदे रद्द, विरोधकांनी घातला गोंधळ

Last Updated : Nov 30, 2021, 3:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.