ETV Bharat / bharat

COVAXIN च्या २ ते १८ वयोगटातील चाचण्या जूनमध्ये, जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळणार परवानगी - कोव्हॅक्सिन लहान मुलांच्या चाचण्या

कोव्हॅक्सिन या कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकने आता लहान मुलांवरील चाचणी सुरू करण्याबाबत माहिती दिली आहे. जून महिन्यापासून या चाचण्या सुरू होणार आहेत, असे कंपनीच्या बिझनेस डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल अ‌ॅडव्होकसी प्रमुख डॉ. राचेस एल्ला यांनी सांगितले.

Paediatric trials of Covaxin may begin in June, bharat biotech may get licence soon
'कोव्हॅक्सिन'च्या लहान मुलांवरील चाचण्या जूनमध्ये होणार सुरू; भारत बायोटेकची माहिती
author img

By

Published : May 24, 2021, 10:57 AM IST

Updated : May 24, 2021, 1:56 PM IST

हैदराबाद : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे कित्येक संशोधकांचे म्हणणे आहे. ही लाट कधी येईल याबाबत कोणालाही अंदाज नसला, तरी तिला तोंड देण्याच्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न करण्यात येत आहेत. कोव्हॅक्सिन या कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकने आता लहान मुलांवरील क्लिनिकल चाचण्या सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत. जून महिन्यापासून या चाचण्या सुरू होणार आहेत, असे कंपनीच्या बिझनेस डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल अ‌ॅडव्होकसी प्रमुख डॉ. राचेस एल्ला यांनी सांगितले.

एफआयसीसीआय लेडीज ऑर्गनायझेशन (एफएलओ)द्वारे आयोजित केल्या गेलेल्या एका चर्चासत्रात डॉ. एल्ला यांनी याबाबत माहिती दिली. भारत बायोटेकने लहान मुलांवरील चाचणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे परवानगी मागितली आहे. याला तिसऱ्या वा चौथ्या तिमाहीच्या शेवटीपर्यंत मंजूरी मिळू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच, यावर्षीच्या शेवटपर्यंत कोव्हॅक्सिनच्या उत्पादनात वाढ होऊन ७०० दशलक्ष डोसेसची निर्मिती करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोव्हॅक्सिन अनेकांचा जीव वाचवत आहे...

त्या म्हणाल्या, की कंपनीने तयार केलेली लस अनेक लोकांचा जीव वाचवत आहे याचा त्यांना आनंद आहे. तसेच, तसेच, केंद्र सरकारने कंपनीला १,५०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली आहे. सरकार कंपनीलाही पूर्णपणे सहकार्य करत असल्याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांवरील वापराला परवानगी मिळू शकते, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारत बायोटेक आणि आयसीएमआरने संयुक्तपणे कोव्हॅक्सिन या कोरोना लसीची निर्मिती केली आहे. डीसीजीआयने यापूर्वीच २ ते १८ वर्षे वयोगटातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली होती. कोव्हॅक्सिन ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची कोरोनावरील लस आहे.

Last Updated : May 24, 2021, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.