ETV Bharat / bharat

Veteran Craft Artist To PM Modi: 'तुम्ही मला चुकीचे सिद्ध केलं', पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर मोदींना म्हणाले शाह रशीद अहमद कादरी

कर्नाटकचे बिद्री कारागीर शाह रशीद अहमद कादरी बुधवारी दिल्लीत प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना भावूक झाले आणि त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बिदरची बिद्री कला ही पिढ्यानपिढ्या आलेली धातूची हस्तकला आहे.

PADMA AWARDS BIDRI CRAFT ARTIST SHAH RASHEED AHMED QUADRI PM MODI KARNATAKA
'तुम्ही मला चुकीचे सिद्ध केलं', पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर मोदींना म्हणाले शाह रशीद अहमद कादरी
author img

By

Published : Apr 6, 2023, 7:21 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकातील एक अनुभवी कारागीर यांच्यात हृदयस्पर्शी संवाद झाला. बुधवारी संध्याकाळी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यानच बिद्रीचे कारागीर शाह रशीद अहमद कादरी यांनी पीएम मोदींना सांगितले की तुम्ही मला चुकीचे सिद्ध केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पद्मश्री मिळालेले कादरी एका व्हिडिओमध्ये पंतप्रधानांशी हस्तांदोलन करताना दिसले.

  • #WATCH | I tried for 10 years to get this award. When BJP govt came, I thought I will not get this award because BJP never gives anything to Muslims, but PM Modi proved me wrong by choosing me for this award: Shah Rasheed Ahmed Quadari, who received Padma Shri award today pic.twitter.com/H3XPTV9xYJ

    — ANI (@ANI) April 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तेव्हा त्यांना भाजप सरकारच्या काळात पद्म सन्मान मिळणार नाही असे वाटत होते. ते म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात मला पद्म पुरस्काराची अपेक्षा होती, पण मिळाला नाही. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर मला वाटले होते की, आता भाजप सरकार मला कोणताही पुरस्कार देणार नाही. पण तुम्ही मला चुकीचे सिद्ध केलेस, असे ते मोदींना म्हणाले. पंतप्रधानांनी नमस्ते आणि हसत त्यांना उत्तर दिले. पद्म पुरस्कार हे तीन श्रेणींमध्ये दिले जातात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री.

भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न, 2019 पासून देण्यात आलेला नाही. पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये दिवंगत मुलायम सिंह यादव, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि लेखिका सुधा मूर्ती यांचा समावेश आहे. सुश्री मूर्ती यांची मुलगी अक्षता, जी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे, राष्ट्रपती भवनाच्या भव्य दरबार हॉलमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इतर मान्यवरांच्या शेजारी पुढच्या रांगेत बसलेली दिसली. सुधा मूर्ती यांचे पती आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती हे इतर पाहुणे आणि कुटुंबीयांसह बसले होते.

  • #WATCH | Padma Shri awardee Shah Rasheed Ahmed Quadari thanked PM Modi after he received the award today

    "During Congress rule, I didn't get it (Padma Shri). I thought BJP govt will not give it to me but you proved me wrong, " says Shah Rasheed Ahmed Quadari pic.twitter.com/BKQGMKc10R

यावेळी अखिलेश यादव यांचे संपूर्ण कुटुंबही उपस्थित होते. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध विषय आणि उपक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो.

हेही वाचा: जम्मू काश्मिरात होतेय जमिनींची खरेदी, ३७० कलम रद्द केल्याचा परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.