ETV Bharat / bharat

Fake IPL IN Gujrat : गुजरातमध्ये सुरु होती फेक 'आयपीएल'; पोलिसांनी केली चार जणांना अटक - गुजरात फेक आयपीएल मराठी बातमी

फोनच्या जोरावर जुगार खेळून रशियात करोडोंचा जुगार खेळणाऱ्या क्रिकेट सट्टेबाजांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मेहसाणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली ( Fake IPL IN Gujrat ) आहे.

Fake IPL IN Gujrat
Fake IPL IN Gujrat
author img

By

Published : Jul 13, 2022, 4:24 PM IST

मेहसाणा - गुन्हेगारीच्या इतिहासात पहिल्यांदाच मेहसाणामध्ये एक घटना उघडकीस आली आहे. फोनच्या जोरावर जुगार खेळून रशियात करोडोंचा जुगार खेळणाऱ्या क्रिकेट सट्टेबाजांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मेहसाणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात 21 खेळाडूंची निवड करण्यात आली होती, ते शेतमजूर ( Fake IPL IN Gujrat )आहेत.

वडनगरमधील मोलीपूर गावात 21 स्थानिक खेळाडूंमध्ये टी-20 सामना खेळला गेला. ज्याचे यु-ट्यूब वरती प्रक्षेपण करण्यात आलं. रशियात बसून काही जण या सामन्यावरती सट्ट लावत होते. त्यासाठी मोलीपूरमधील धरोई कालव्याजवळील गुलाम मासी यांच्या शेताचा वापर करण्यात आला. हे शेत सोएब अब्दुल वाला यांनी भाड्याने दिले होते. ज्यामध्ये क्रिकेटचे मैदान तयार करून दोन संघ तयार करण्यात आले. जमिनीवर अत्याधुनिक कॅमेरा सेटअप करण्यात आला होता. ज्याद्वारे या सामन्याचे चित्रीकरण करण्यात आले आणि क्रिकेरोस नावाच्या नावाच्या अॅपद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं. हा सामना पाहण्यासाठी ह्या अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागणार होते.

गुजरातमध्ये सुरु असलेली फेक आयपीएल

संपूर्ण थेट प्रक्षेपणाची जबाबदारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मोहम्मद साकिब रियाझुद्दीन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्याने त्याचा टेलिग्राम (सोशल मीडिया अॅप्लिकेशन) उघडला आणि रशियातील सट्टेबाज आशिफ मोहम्मदशी गप्पा मारल्या. जी खरोखरच फसवणूक होती. त्यानंतर, त्याच्या सूचनेनुसार, पंच कोल्हू मोहम्मद अबुबकर आणि सादिक अब्दुल मजीद दावडा चौकार मारतील किंवा विकेट घेतील. असा क्रिकेटचा सामना 15 दिवसांपासून सुरू होता. हे संपूर्ण नेटवर्क शोएब दावडा आणि रशियाचा शकुनी आशिफ मोहम्मद यांच्या सांगण्यावरून चालवले जात होते.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सामना खेळणारे खेळाडू किंवा क्रिकेटची तयारी करणारे तरुण नव्हते. हे सर्व शेतमजूर होते. ज्याला रोज 400 रुपये पगार मिळत होता. या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरमाईंड शोएबचा प्लॅन होता. "मोठा संघ मैदानावर खेळत आहे," त्याने रशियन लोकांना सांगितले. हे सर्व रशियातील जनतेला लुटण्यासाठी रचण्यात आलं होते.

थोडक्यात हे सगळे सामने फिक्स होते. रशियाकडून ऑर्डर आल्यास किंवा आऊट आणि चौकार लगावण्यात येत होता. थेट प्रक्षेपणादरम्यान फक्त 30-यार्ड वर्तुळ दाखवण्यात आले. प्रसारणात फक्त पंच, गोलंदाज, फलंदाज, यष्टिरक्षक आणि आसपासचे खेळाडू दाखवले गेले. काही लोक सामना पाहण्यासाठी आले आहेत. चेंडू कुठल्या दिशेला पकडला गेला हे कळत नव्हते.

मेहसाणाच्या ग्रामीण भागात खेळला जाणार सामना रशियातील लोक मोठा मानू लागले. रोज दोन ते तीन सामने खेळले जात. रशियात राहणाऱ्या शोएबने ही योजना आखली होती. तीन-चार महिने तो रशियात होता. त्यानंतर आशिफची मोहम्मदशी ओळख झाली. शोएबला दरमहा एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. मेरठच्या सैफी मोहम्मद साकिबला प्रसारण हक्क म्हणून 30,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणाची माहिती मेहसाणाच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शोएब अब्दुल, सैफी मोहम्मद रियाजुद्दीन, कोलू मोहम्मद अबुबकर, सादिक अब्दुल यांना अटक केली आहे.

हेही वाचा - Chief Minister Shivraj Singh Chouhan: मुख्यमंत्र्यांना चवहीन चहा दिल्याबाबत अधिकाऱ्याला बजावलेली नोटीस सोशल मीडियावर तूफान व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.