ETV Bharat / bharat

Organic Foods festival : पणजीत ‘सेंद्रीय खाद्यान्न महोत्सवाचे' आयोजन; राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन - Amrit Mahotsav of Freedom in Panaji

केंद्रीय पर्यटन आणि नौवहन, जलमार्ग आणि बंदर खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक ( Minister of State Shripad Naik inorganized organic food festival ) यांच्या हस्ते आज नैसर्गिक खाद्यान्न महोत्सवाचे उद्घाटन ( Organic Foods festival in Panji ) करण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि पर्यटन मंत्रालयाच्या ( Institute of Hotel Management and Ministry of Tourism ) पश्चिम विभागीय कार्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Amrit Mahotsav of Freedom in Panaji ) एकदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Inauguration of Organic Food Festival by Minister of State Shripad Naik
राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सेंद्रीय खाद्यान्न महोत्सवाचे उद्घाटन
author img

By

Published : Aug 7, 2022, 7:50 PM IST

पणजी (गोवा): केंद्रीय पर्यटन आणि नौवहन, जलमार्ग आणि बंदर खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक ( Minister of State Shripad Naik inorganized organic food festival ) यांच्या हस्ते आज नैसर्गिक खाद्यान्न महोत्सवाचे उद्घाटन ( Organic Foods festival in Panji ) करण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि पर्यटन मंत्रालयाच्या ( Institute of Hotel Management and Ministry of Tourism ) पश्चिम विभागीय कार्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Amrit Mahotsav of Freedom ) एकदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यटन सचिव रवी धवन, भारत पर्यटन पश्चिम विभागाचे संचालक व्यंकटेनशन, हॉटेल व्यवस्थापन संस्थेच्या प्राचार्या श्रीमती डोना डिसूझा यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

Minister of State Shripad Naik while inspecting food under Organic Food Festival
सेंद्रीय खाद्यान्न महोत्सवांतर्गत अन्नाची पाहणी करताना राज्यमंत्री श्रीपाद नाईंक

गोव्यातील पारंपरिक पदार्थांची मार्केटिंग- नैसर्गिक खाद्यान्न महोत्सवाचे आयोजन करुन हॉटेल व्यवस्थापन संस्थेने गोव्यातील पारंपरिक पदार्थांची पश्चिम विभागातून आलेल्या हॉटेल व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांना तसेच पाहुण्यांना ओळख करुन दिल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी संस्थेचे कौतुक केले. निरोगी आरोग्याची सुरुवात पोषण आहारापासून होते. त्यामुळे आपण सकस आणि सेंद्रीय आहाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडत सेंद्रीय पदार्थांना आहारात महत्त्वाचे स्थान द्यावे, असे प्रतिपादन श्रीपाद नाईक यांनी केले.

Minister of State Shripad Naik and Mrs. Donna D'Souza at the Organic Food Festival
राज्यमंत्री श्रीपाद नाईक व श्रीमती डोना डिसूझा सेंद्रीय खाद्यान्न महोत्सवात

250 विद्यार्थी खाद्य महोत्सवासाठी गोव्यात - गोवा जागतिक नकाशावर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे सर्व घटकांनी मिळून गोव्याच्या पारंपरिक पदार्थांना जागतिक पातळीवर पोहचविले जाऊ शकते, असे श्रीपाद नाईक म्हणाले. सरकार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर (घरोघरी) तिरंगा मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाईक यांनी याप्रसंगी केले. गांधीनगर, भोपाळ, मुंबई आणि बेंगळुरु येथून 250 विद्यार्थी खाद्य महोत्सवासाठी गोव्यात आले आहेत. पारंपरिक पदार्थांना चालना देण्यासाठी हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्या श्रीमती डोना डिसूझा म्हणाल्या.

Minister of State Shripad Naik and other dignitaries while tasting the food grains at the Organic Food Festival
सेंद्रीय खाद्यान्न महोत्सवामध्ये खाद्यान्नाचा स्वाद घेताना राज्यमंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवर

हेही वाचा- Pune Crime News : ऐकावं ते नवलचं, 'पोपट वारंवार शिट्टी मारतो, त्यामुळे...'; पुणेकराने केली पोलिसांत तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.