ETV Bharat / bharat

गावकऱ्यांची चिंता मिटणार, आता ATM मधूनही औषधं मिळणार - एटीएम

आता खेडे आणि छोट्या शहरांतील नागरिकांनाही औषधांची चिंता करावी लागणार नाही. कारण, आता एटीएममध्येच औषधं मिळणार आहेत. नक्की कशी असेल एटीएममधून औषधं मिळवण्याची प्रक्रिया? वाचा सविस्तर...

atm machine
atm machine
author img

By

Published : Sep 18, 2021, 1:00 PM IST

Updated : Sep 18, 2021, 1:14 PM IST

मुंबई : आता खेडे आणि छोट्या शहरांतील नागरिकांनाही औषधांची चिंता करावी लागणार नाही. त्यांना फक्त एटीएममध्ये जावे लागणार आहे. कारण, आता एटीएममध्येच औषधं मिळणार आहेत. औषध एटीएम मशीन देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये बसवल्या जाणार आहेत. यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरने (CSC) आंध्र प्रदेश सरकारच्या AMTZ कंपनीशी करार केला आहे. संजीवनी केंद्रे आधीच CSC च्या ब्लॉक स्तरावर चालू आहेत. या केंद्रांवर औषधे वितरीत करणारे एटीएम बसवले जातील. गर्भधारणा, कोरोना चाचणीसह इतर अनेक वैद्यकीय उपकरणे देखील या केंद्रांवर ठेवली जातील. CSC च्या ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून त्यांच्या कार्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.

CSC द्वारे गावांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर किंवा कॉन्सन्ट्रेटर पुरवले जातील. काही रक्कम भरून त्यांचा वापर केला जाऊ शकतो. चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरीस सर्व ब्लॉकमध्ये औषध एटीएम बसवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. CSC एसपीव्हीचे एमडी दिनेश त्यागी म्हणाले, की गावकरी डॉक्टरांशी आभासी मार्गाने सल्ला घेण्यासाठी आधीच काम करत आहेत.

नक्की कशी असेल प्रक्रिया?

तसेच, 'औषधाचे प्रिस्क्रिप्शन देखील आभासी पद्धतीने तयार केले जाते. परंतु गावकऱ्यांना औषध घेण्यासाठी शहरात जावे लागते किंवा कोणाला ते आणण्यासाठी पाठवावे लागते. यात वेळ लागतो. पण आता एटीएमच्या सुविधेमुळे त्यांना लगेच औषध मिळेल. डॉक्टरांची स्लिप एटीएम मशीनमध्ये टाकली जाईल आणि त्यानुसार मशीनमधून औषध बाहेर येईल. ई-कॉमर्स कंपन्या मशीनमध्ये औषध पुरवठा करतील. बहुतेक जेनेरिक औषधांसह इतरही औषधे एटीएम मशीनमध्ये ठेवली जातील. याशिवाय, केंद्रामध्ये विविध प्रकारच्या चाचणी उपकरणांसाठी सुविधाही असतील', असेही त्यागी म्हणाले.

हेही वाचा - सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Last Updated : Sep 18, 2021, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.