ETV Bharat / bharat

वेदामध्ये लिहिले नसल्याने चारधाम यात्रेचे लाईव्ह स्ट्रिमिंग नाही- पुष्कर सिंह धामी - चारधाम यात्रेचे लाईव्ह स्ट्रिमिंग

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, की सर्वांच्या सूचना विचारात घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर चारधाम यात्रेचे लाईव्ह स्ट्रीमिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, वेदामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगचे लिहिण्यात आलेले नाही.

पुष्कर सिंह धामी
पुष्कर सिंह धामी
author img

By

Published : Jul 17, 2021, 10:20 PM IST

डेहराडून (उत्तराखंड) - उत्तराखंड सरकार चारधाम यात्रेचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार नाही. कारण, वेदामधील पद्धतीमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगचा उल्लेख नाही, असे अजब विधान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माध्यमांशी बोलताना केले केले.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, की सर्वांच्या सूचना विचारात घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर चारधाम यात्रेचे लाईव्ह स्ट्रीमिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, वेदामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगचे लिहिण्यात आलेले नाही. दिल्ली उच्च न्याायालयात तसे आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहोत, असे पुष्कर सिंह धामी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा-अमेरिकेत आढळला दुर्मीळ मंकीपॉक्स रोग; नायजेरियाहून आलेल्या प्रवाशाला लागण

केवळ तीन जिल्ह्यातील रहिवाशांना चारधाम यात्रेची परवानगी

उत्तराखंड उच्च न्यायालयाने 1 जुलैला चामोली, रुद्रप्रयाग आणि उत्तराक्षी जिल्ह्यामधून होणाऱ्या चारधाम यात्रेवर स्थगिती आणली आहे. या निर्णयाला उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी आव्हान दिले आहे. दरवर्षी चारधाम यात्रेनिमित्त केदारनाथ मंदिरात लाखो पर्यटक आणि भाविक भेट देत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने केवळ तीन जिल्ह्यातील रहिवाशांना चारधाम यात्रेची परवानगी दिली आहे.

हेही वाचा-शरद पवार गुगली टाकण्यात एक्स्पर्ट, मोदी-पवार भेटीवर सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया

उत्तराखंडने रद्द केली कावड यात्रा-

उत्तराखंड सरकारने कावड यात्रा रद्द केली आहे. असे असले तरी हरिद्वारमधून गंगाजल टँकरने घेण्याची परवानगी दिली आहे. यंदा 23 जुलैला श्रावण महिन्याचा प्रारंभ होणार आहे. या काळात शिवभक्त हे गंगा आणि अन्य नदीमधून जल घेऊन शिवमंदिरात अर्पण करतात. ही यात्रा कावड यात्रा म्हणून ओळखली जाते. गतवर्षीही राज्य सरकारने कावड यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.