ETV Bharat / bharat

Missile Passes Over Japan : उत्तर कोरियाने डागले क्षेपणास्त्र ; जपानवरून जात असताना पॅसिफिक महासागरात कोसळले - North Korea Fires Medium

उत्तर कोरियाने मंगळवारी एक मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला जो जपानवरून जात असताना पॅसिफिक महासागरात कोसळला. ( Ballistic Missile Passes Over Japan ) जपान आणि दक्षिण कोरियाने ही माहिती दिली.

Missile Passes Over Japan
बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा मारा
author img

By

Published : Oct 4, 2022, 12:24 PM IST

कोरिया : उत्तर कोरियाने मंगळवारी एक मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला जो जपानवरून जात असताना पॅसिफिक महासागरात कोसळला. ( Ballistic Missile Passes Over Japan ) जपान आणि दक्षिण कोरियाने ही माहिती दिली. उत्तर कोरियाने या भागातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना लक्ष्य करणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या चाचण्या तीव्र केल्याचे समजते. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, उत्तर कोरियाने डागलेले किमान एक क्षेपणास्त्र जपानमधून जात असताना पॅसिफिक महासागरात पडण्याची शक्यता होती

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी चर्चा : जपानी अधिकाऱ्यांनी ईशान्येकडील रहिवाशांना जवळपासच्या इमारती रिकामी करण्यासाठी 'जे-अलर्ट' जारी केला आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच असा 'अलर्ट' जारी करण्यात आला आहे. जपानच्या होक्काइडो आणि आओमोरी भागातील रेल्वे सेवा, ज्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या, आता पूर्ववत करण्यात आल्या आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा ( Japanche Pant President Fumio Kishida ) यांनी पत्रकारांना सांगितले की, उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या चाचण्यांचा आपण तीव्र निषेध करतो. या परिस्थितीबाबत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जपानच्या मंत्रिमंडळाचे मुख्य सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले की, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळाली : ते म्हणाले की 22 मिनिटे हवेत राहिल्यानंतर हे क्षेपणास्त्र देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर समुद्रात पडले. दक्षिण कोरियाच्या 'जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ'ने सांगितले की, त्यांना उत्तर कोरियाच्या अंतर्देशीय प्रदेशातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळाली आहे. ते म्हणाले की, दक्षिण कोरियाच्या लष्कराने पाळत ठेवली आहे आणि अमेरिकेशी जवळून समन्वय साधत आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल म्हणाले की, उत्तर कोरियाने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले आहे जे 4,000 किलोमीटर (2,485 मैल) पल्ला गाठू शकते.

गेल्या १० दिवसांत घेतलेली ही पाचवी चाचणी : म्हणजेच हे क्षेपणास्त्र ग्वामपर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल. यून म्हणाले की त्यांनी प्रक्षेपणावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली. ते म्हणाले की, दक्षिण कोरिया आणि आंतरराष्ट्रीय समुदाय उत्तर कोरियाच्या बेपर्वा आण्विक चिथावणीला तीव्र प्रतिक्रिया देईल. उत्तर कोरियाने गेल्या १० दिवसांत घेतलेली ही पाचवी चाचणी आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सराव आणि जपानशी निगडित मित्र राष्ट्रांनी केलेल्या इतर प्रशिक्षणाचा तो बदला असल्याचे दिसते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.