इंदौर - आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचे काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतात. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात आंब्यांच्या प्रजाती उपलब्ध आहेत. अफगानिस्तानची प्रजाती असलेली नूरजहांचे काही उरले-सुरली झाडे मध्यप्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा परिसरात आढळली जातात. हा भाग गुजरात राज्याच्या थोडा जवळ आहे. एका नूरजहां आंब्याची किंमत ही 500 ते 1000 रुपये असते.
इंदौर शहरापासून नूरजहां आंब्याची झाडे ही 250 किलोमीटर अंतरावर आहे. या नूरजहां आंब्याची बुकींग अगोदरच झाली आहे. तीन झाडांवर 250 आंबे आहेत. एका नूरजहां आंब्याचे वजन हे 2 ते 3.5 किलोपर्यंत आहे.
नूरजहां अब्यांना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मोहोर लागतो आणि जून महिन्याच्या सुरुवातीला आंबे पिकून तयार होतात. विशेष म्हणजे, या आंब्याची लांबी एक फूटांपर्यंत होऊ शकते. तर या अंब्याच्या कोयीचेच वजन 150 ते 200 ग्राम असते. यंदा आब्यांचे पीक चांगले आले आहे. मात्र, कोरोनाचा व्यापारावर परिणाम झाला आहे. तर वर्ष 2019 मध्ये नूरजहां जातीच्या एका आंब्याचे वजन सरासरी 2.75 किलो होते. तर तेव्हा या आंब्याना 1200 रुपये भाव मिळाला होता.