पाटणा ( बिहार ): बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपची युती तुटली आहे. सर्व अटकळांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान, त्यांनी सरकार स्थापनेचा दावाही केला आहे. उद्याच शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. ( Nitish Kumar resigns as Chief Minister ) ( Nitish Kumar Breaks Alliance with BJP ) ( Nitish Kumar Meets Bihar Governer )
उपेंद्र कुशवाह यांनी ट्विट करून एनडीए युती तुटण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. जेडीयूच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. औपचारिक घोषणेची प्रतीक्षा असली तरी दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले आहेत. राजभवनाबाहेर जेडीयूचे कार्यकर्ते नितीश कुमार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राजभवनाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
-
#WATCH | Nitish Kumar confirms that he has resigned as Bihar CM pic.twitter.com/Av04rUXojx
— ANI (@ANI) August 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Nitish Kumar confirms that he has resigned as Bihar CM pic.twitter.com/Av04rUXojx
— ANI (@ANI) August 9, 2022#WATCH | Nitish Kumar confirms that he has resigned as Bihar CM pic.twitter.com/Av04rUXojx
— ANI (@ANI) August 9, 2022
सूत्रांवर विश्वास ठेवला तर, बिहारमधील नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे. आज नितीश कुमार राज्यपालांची भेट घेऊन आमदारांना पाठिंब्याचे पत्र सादर करणार आहेत. त्याचबरोबर महाआघाडीच्या बैठकीत नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसने यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील.