प्रतापगड - उदयपूर येथील कन्हैयालाल हत्या प्रकरणात ( Kanhaiyalal Murder case ) एनआयए आणि एटीएसने बुधवारी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. प्रतापगड जिल्ह्यातील परसोला येथील रहिवासी खान रझा मुलगा शेर मोहम्मद याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याला घेऊन एनआयएची टीम जयपूरला रवाना झाल्याची माहिती ( nia detained person Kanhaiyalal Murder case ) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खान रझा मुलगा शेर मोहम्मद हा कट्टरतावादी संघटना टीलपी संघटनेचा सदस्य आहे. तो कन्हैयालाल हत्याकांडातील मुख्य आरोपी गौस मोहम्मद याच्या संपर्कात होता. दोघांची ओळख दहा वर्षांपूर्वीची आहे. परसोला पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रकाश चंद्र यांनी सांगितले की, एनआयएचे निरीक्षक तेथे पोहोचले आणि त्यांनी शेर मोहम्मदला बोलावले. विशेष म्हणजे, कन्हैयालाल हत्याकांडानंतर प्रतापगडमध्ये घोषणाबाजी करण्यात आली होती, त्याचबरोबर शहरातील एका भागात नुपूर शर्माच्या निषेधार्थ पोस्टरही रस्त्यावर चिकटवण्यात आले होते. स्थानिक पोलिसांचा समज आणि कडक कारवाईमुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात राहिली होती.
28 जून रोजी कन्हैयालालची हत्या - 28 जून रोजी कन्हैयालाल साहूची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. गौश मोहम्मद आणि रियाझ त्या दिवशी कुर्ता शिवण्यासाठी कन्हैयाच्या दुकानात पोहोचले होते. यादरम्यान कन्हैया कुर्त्याचे माप घेत असताना गौश मोहम्मद आणि रियाझने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यादरम्यान आरोपीने एक व्हिडिओही बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सध्या एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे.