नवी दिल्ली - राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष (निवृत्त न्यायाधीश) अरुण मिश्रा यांनी निवडणुकीनंतर झालेल्या पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षांनी इंटेल ब्युरोचे माजी अध्यक्ष राजीव जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एनएचआरसी समिती ही पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचा तपास करणार आहे. समितीला तातडीने चौकशी करण्याचे निवृत्त न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी आदेश दिले आहेत.
समितीमध्ये हे असणार सदस्य-
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने नेमलेल्या समितीत राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष अतिफ रशीद, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य राजूबेन एल. देसाई, एनएचआरसीचे (तपास) महासंचालक संतोष मिश्रा, पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगाचे प्रबंधक प्रदीप कुमार पंजा, पश्चिम बंगाल राज्य कायदे सेवा प्राधिकरणाचे सचिव राजू मुखर्जी आणि एनएचआरसीचे डीआयजी (तपास) मन्झील सैनी यांचा समावेश आहे.
हेही वाचा-सरकारविरोधात आंदोलनाकरिता काँग्रेस करणार नियोजन; सोनिया गांधींनी २४ जूनला बोलाविली बैठक
राज्यात 37 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा भाजपचा दावा-
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात 37 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा दावा पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी केला होता. गेल्या पाच वर्षांत भाजपाच्या 166 कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. तर कार्यकर्त्यांवर 30 हजार पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 37 कार्यकर्ते मारले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये तीव्र असण्याची शक्यता- आयआयटी कानपूर