एनएचपीसी लिमिटेड (NHPC Recruitment 2023) नोकरीची उत्तम संधी देत आहे. एनएचपीसी ने प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (Opportunity for Engineer and Officer Candidates) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये एकुण 401 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आणि इच्छुक असलेले सर्व उमेदवार http://www.nhpcindia.com ला भेट देऊ शकतात आणि संबंधित पदांबाबतची माहिती मिळवु शकतात. या पदांसाठी अर्ज (Job Opportunity) सादर करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2023 आहे. अंतिम तारखेनंतर अर्ज स्विकारल्या जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
विविध पदांसाठीच्या जागा : मिळालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, प्रशिक्षणार्थी अभियंता सिव्हिल 136 जागा, प्रशिक्षणार्थी अभियंता इलेक्ट्रिकल 41 जागा, प्रशिक्षणार्थी अभियंता मेकॅनिकल 108 जागा, प्रशिक्षणार्थी अधिकारी वित्त 99 जागा, प्रशिक्षणार्थी अधिकारी एचआर 14 जागा, आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी कायदा 03 पदांची भरती करण्यात येणार आहे. या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेग-वेगळी आहे. आता अशा परिस्थितीत ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा http://www.nhpcindia.com या वेबसाईटवर जाऊन तपासू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, त्यांना अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या अटी व शर्ती उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यानंतरच आर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी काय आहे प्रोसेस : अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम सर्व उमेदवारांनी एनएचपीसी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. http://www.nhpcindia.com . त्यानंतर मुख्यपृष्ठावरील करिअर विभागात जा. त्यानंतर तुम्ही Recruitment वर क्लिक करा. आता तुम्हाला NHPC Recruitment 2023 वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला Apply Online वर क्लिक करावे लागेल. आता तुम्ही अर्जात दिलेली सर्व माहिती अचूक भरा. त्यात सर्व महत्वाची कागद पत्रे अपलोड करा. यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. यानंतर तुम्ही खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही अर्ज फी भरा. तुम्हाला खाली दिलेल्या कमिटी बटणावर क्लिक करा, तुम्ही अर्ज पूर्णपणे भरला आहे. शेवटी एक प्रिंट काढा जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग होईल.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : एनएचपीसी भरती 2023 साठी, एनएचपीसी भर्ती अंतर्गत 401 पदांसाठी भरती अधिसूचना काढण्यात आली आहे. प्रशिक्षण अभियंता आणि प्रशिक्षण अधिकारी या दोन प्रकारच्या जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी एनएचपीसी भर्ती 2023 साठी ऑनलाईन अर्ज भरावे लागतील. 5 जानेवारी 2023 सकाळी 10 वाजता पासुन ही प्रक्रीया सुरु झालेली आहे. आणि आता 25 जानेवारी 2023 रोजी रात्री 11:55 पर्यंत फॉर्म भरले जाईल.